IPL 2025 Retentions : रोहित शर्माचं ठरलं ! मुंबई इंडियन्सं 5 खेळाडूंना केलं रिटेन, वाचा संपूर्ण यादी

IPL 2025 Retentions Mumbai Indians : आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी मुंबई इंडियन्सनं जाहीर केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2025 Retentions List Mumbai Indians
मुंबई:


IPL 2025 Retentions Mumbai Indians : पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. यावर्षी टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट टीममधील कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह हे चार महत्त्वाचे खेळाडू मागील आयपीएल सिझनमध्ये मुंबई इंडियन्सचे सदस्य होते. त्याचबरोबर इशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड हे देखील मुंबई इंडियन्सचे सदस्य असल्यानं आगामी मेगा ऑक्शनपूर्वी कुणाला रिटेन करायचं हा मोठा प्रश्न टीम मॅनेजमेंटकडं होता.

आयपीएल 2025 मेगा ऑक्शनपूर्वी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी मुंबई इंडियन्सनं जाहीर केली आहे. त्यानुसार रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा या खेळाडूंना मुंबई इंडियन्सनं रिटेन केलं आहे. या पाच जणांना रिटेन करण्यासाठी मुंबई इंडियन्सनं 75 कोटी खर्च केले आहेत.  त्यामुळे आता आगामी मेगा ऑक्शनसाठी एकूण 120 कोटींच्या बजेटमधील  कोटी रुपये मुंबई इंडियन्सकडं 45 कोटी शिल्लक आहेत.

मुंबई इंडियन्सनं रिटेन केलेले खेळाडू आणि त्यांना मिळालेली रक्कम

  • रोहित शर्मा - 16.30 कोटी
  • जसप्रीत बुमराह - 18 कोटी
  • सूर्यकुमार यादव - 16.35 कोटी
  • हार्दिक पांड्या - 16.35 कोटी
  • तिलक वर्मा - 8 कोटी

नवी भरारी घेण्याचं आव्हान

मुंबई इंडियन्सनं शेवटचं आयपीएल विजेतेपद 2020 साली जिंकलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये सलग तीन वर्ष विजेतेपद जिंकण्यात मुंबई इंडियन्सला अपयश आलं. त्यामुळे मागील सिझनपूर्वी फ्रँचायझीनं मोठा निर्णय घेत रोहित शर्माला हटवून हार्दिक पांड्याला कॅप्टन केलं.

मुंबई इंडियन्सच्या फॅन्सना हा निर्णय आवडला नाही. सोशल मीडियावर तसंच मैदानातही फॅन्सकडून याचे जोरदार पडसाद उमटले. मुंबई इंडियन्सची मागील सिझनमधील कामगिरी देखील खराब होती. ते पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर होते. आता आगामी सिझनमध्ये नवी भरारी घेण्याचं आव्हान टीमपुढं आहे.