IPL 2025 SRH vs RR: आयपीएलमधील दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्समध्ये होत आहे. हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या हैदराबादच्या सलामवीरांनी तुफान फटकेबाजी सुरु केली असून अवघ्या सहा षटकांमध्ये 90 धावा कुटल्यात.
हैदराबादचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅव्हिस हेडने चौकार षटकारांचा पाऊस पाडत अवघ्या चेंडूंमध्ये अर्धशतकी खेळी केली . अभिषेक वर्माने 24 धावा करत आपली विकेट गमावली. त्यानंतर मैदानात आलेल्या ईशान किशनने हेडला साथ देत चौकार षटकारांची आतषबाजी केली. ट्रॅव्हिस हेडने 21 धावात आपले अर्धशतक पूर्ण केले ज्यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकार लगावले. दुसरीकडे ईशान किशननेही 14 चेंडूंमध्ये 30 धावा केल्यात.
सामन्यामध्ये जोफ्रा आर्चरच्या एकाच षटकात हेडने 23 धावा कुटल्या.डावाच्या पाचव्या षटकामध्ये जोफ्रा आर्चरने 3 चौकार आणि एका षटकारासह 23 धावा दिल्या. या दोघांच्या फटकेबाजीमुळेच हैद्राबादचा संघाचे 10 षटके पूर्ण होण्याआधीच शतक पूर्ण झाले . हेड तुफान फटकेबाजी करत असतानाच तुषार देशपांडेने त्याचा काटा काढला. तो 31 धावात 67 धावा करुन आऊट झाला.