IPL 2025, SRH vs DC : दिल्लीच्या निराशजनक कामगिरीनंतर पावसाचा अडथळा, स्पर्धेतील रंगत वाढणार!

IPL 2025, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals : दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्सपुढं विजयासाठी 134 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals : आयपीएल 2025 मधील 55 वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात पावसाचा अडथळा आला. पावसाचा अडथळा येण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सनं सनरायझर्सपुढं विजयासाठी 134 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दिल्लीची निराशाजनक बॅटिंग

दिल्ली कॅपिटल्सनं या सिझनची सुरुवात पाच सामने सलग जिंकून केली होती. पण, त्यानंतर त्यांची वाटचाल अडखळती राहिली आहे. पाँईट टेबलमध्ये सध्या पाचव्या क्रमांकावर असलेल्या दिल्लीला 'प्ले ऑफ' ची प्रबळ दावेदारी कायम राखण्यासाठी हा सामना जिंकणे आवश्यक होतं. पण, दिल्लीच्या बॅटर्सनी निराशा केली. 

दिल्लीची सुरुवात खराब झाली. टीम इंडियातील जागेचा दावेदार असलेला करुण नायर (Karun Nair) पहिल्याच बॉलवर भोपळाही न फोडता आऊट झाला. त्यानंतर अनुभवी फाफ ड्यू प्लेसिस (3) आणि अभिषेक परोळ (8) रन काढून आऊट झाला.

(नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
 

3 विकेट्सची फक्त 15 रन्सवर गमावल्यानंतर दिल्लीची भिस्त केएल राहुल (KL Rahul) आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांच्यावर होती. पण, या दोघांनाही मोठा स्कोअर करण्यात अपयश आलं. राहुल 10 तर अक्षर पटेल 6 रन काढून आऊट झाले.

Advertisement

हैदराबादच्या माऱ्यापुढे दिल्लीची अवस्था आधी 5 आऊट 29 नंतर 6 आऊट 62 झाली होती. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि अभिषेक शर्मा या आक्रमक बॅटरनं त्यांच्या नैसर्गिक खेळाला मुरड घातली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 66 रन्सची महत्त्वाची भागिदारी केली.

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : चांगल्या कामगिरीनंतरही बुमराहला बसणार धक्का, BCCI च्या मनात काय? )
 

आशुतोष 41 रन काढून आऊट झाला. तर स्टब्स 41 रन्सवरच नाबाद राहिला. या दोघांच्या उपयुक्त खेळीमुळे दिल्लीनं पूर्ण 20 ओव्हर्स खेळून काढले. दिल्लीनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 133 पर्यंत मजल मारली.

Advertisement

सनरायझर्स हैदराबादकडून कॅप्टन पॅट कमिन्स सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 3 विकेट्स घेतल्या. तर जयदेव उनाडकत, हर्षल पटेल, मलिंगा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.