IPL 2026 Auction Update : आयपीएल 2026 साठीचं ऑक्शन अखेर पार पडलं. अबू धाबीमध्ये झालेल्या या ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा कॅमेरुन ग्रीन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला 25 कोटी 20 लाख इतकी मोठी रक्कम देत केकेआरनं खरेदी केलं. कार्तिक शर्मा तसंच प्रशांत वीर या नवोदीत खेळाडूंनाही सीएसकेनं मोठी रक्कम देत खरेदी केलं.
वेगवेगळ्या खेळाडूंवर मोठी बोली लागत असताना मुंबईकर पृथ्वी शॉ याला सुरुवातीच्या दोन टप्प्यात निराशा सहन करावी लागली. पहिल्या दोन राऊंडमध्ये तो अनसोल्ड ठरला.
अखेर ऑक्शनमधील शेवटच्या राऊंडमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं त्याला 75 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं. तो दिल्लीकडून केएल राहुलसोबत ओपनिंग करताना दिसेल.
( नक्की वाचा : IPL 2026 Auction : सरफराज खानला मिळाली संधी! फिटनेस सुधारला, रन्सचा पाऊस पाडला, सुरुवातीला निराशा, पण अखेर... )
पुन्हा एकदा दिल्लीकर
पृथ्वी शॉसाठी दिल्लीची टीम नवी नाही. त्यानं 2018 मध्ये दिल्लीकडूनच आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. तो 2024 पर्यंत या टीमचा सदस्य होता. आक्रमक खेळासाठी प्रसिद्ध असलेल्या पृथ्वी शॉनं दिल्लीकडून आत्तापर्यंत 79 सामन्यात 147.47 च्या स्ट्राईक रेटनं 1892 रन्स केले आहेत. यामध्ये 14 हाफ सेंच्युरीचा समावेश असून 99 हा त्याचा सर्वोच्च आयपीएल स्कोअर आहे.
पृथ्वी शॉ मागील आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड ठरला होता. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यानं चांगली कामगिरी केली. पण, राष्ट्रीय निवड समितीचं लक्ष वेधून घेण्यात त्याला अपयश आलं.
( नक्की वाचा : IPL Auction 2026 LIVE: आयपीएल ऑक्शनमध्ये कोणत्या टीमनं कोणता खेळाडू खरेदी केला? वाचा संपूर्ण यादी )
दरम्यानच्या काळत मुंबई ही त्याची देशांतर्गत क्रिकेटमधील टीमही पृथ्वीनं सोडली. तो आता महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळतो.
पृथ्वी शॉ हा साईबाबांचा भक्त आहे. गेली वर्षभर त्यानं ठेवलेल्या सबुरीला अखेर यश मिळालं आहे. तो आता दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएलस खेळणार आहे. पृथ्वीच्या क्रिकेट करिअरमधील ही दुसरी इनिंग मानली जातीय. ही इनिंग तो किती गाजवतोय त्यावर त्याचं पुढील भवितव्य अवलंबून असणार आहे.