LSG vs DC : ही कसली जादू ! दिल्लीच्या नव्या हिरोनं टाकला IPL 2026 मधील सर्वात घातक बॉल! VIDEO पाहातच राहाल

IPL 2026 LSG vs DC : या सामन्यात मॅचच्या निकालापेक्षा एका घातक बॉलची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे

जाहिरात
Read Time: 2 mins
IPL 2026 LSG vs DC : आयपीएल 2026 मधील हा सर्वात घातक बॉल मानला जात आहे.
मुंबई:

IPL 2026 LSG vs DC : आयपीएल 2026 मधील बुधवारचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Lucknow Super Giants vs Delhi Capitals) यांच्यात झाला. दिल्ली कॅपिटल्सनं हा सामना 6 विकेट्सनं जिंकत या सिझनची सुरुवात विजयानं केली आहे. 

आयपीएलमधील 2026 मधील सर्वात घातक बॉल

या सामन्यात मॅचच्या निकालापेक्षा एका घातक बॉलची चर्चा क्रिकेट विश्वात सुरु आहे. दक्षिण आफ्रिका आणि दिल्ली कॅपिटल्सचा फास्ट बॉलर लुंगी एन्गिडीनं हा बॉल टाकला. 

Advertisement

T20 क्रिकेटमध्ये स्फोटक बॅटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निकोलस पुरनला एन्गिडीनं हा बॉल टाकला. 9 व्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर दिल्लीचा वेगवान बॉलर लुंगी एन्गिडी याने एक अतिशय संथ (स्लोअर) चेंडू टाकला. हा चेंडू समजण्यात पूरनची मोठी चूक झाली आणि शॉट खेळण्याच्या नादात त्याने आपलीच बॅट स्वतःच्या पायावर मारून घेतली. चेंडू पॅड आणि बॅटच्या मधून थेट स्टंपमध्ये घुसला आणि पूरन बोल्ड झाला.

( नक्की वाचा : Arjun Tendulkar: मुंबई इंडियन्सशी रक्ताचं नातं, तरीही अर्जुननं का सोडली साथ? पहिल्यांदाच सांगितलं कारण )

ते गुपित शस्त्र

लुंगी एन्गिडीने पूरनला ज्या स्लोअर चेंडूवर बाद केले, तो चेंडू त्याने टी20 वर्ल्ड कप दरम्यान खास तयार केला होता. तिथेही त्याने या चेंडूच्या जोरावर अनेक बड्या बॅटर्सना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. आयपीएल 2026 च्या आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने या शस्त्राचा वापर करून पूरनला चकित केले.

एन्गिडीची दिल्ली कॅपिटल्सकडून ही पहिलीच मॅच होती. पदार्पणाच्या सामन्यातच त्यानं मॅनेटमेंटचा त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. लखनौमध्ये झालेल्या या मॅचमध्ये लुंगी एन्गिडीची पहिली ओव्हर थोडी महागडी ठरली. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये 10 रन्स दिले.  पण त्यानंतर त्याने जे कमबॅक केलं ते वाखाणण्याजोगे होतं. पुढच्या केवळ 16 चेंडूंमध्ये त्याने फक्त 17 रन देत 3 महत्त्वाचे विकेट झटकले. त्याने पूरन व्यतिरिक्त एनरिक नॉर्ख्या आणि मोहसिन खान यांनाही आऊट केले. एन्गिडीने एकूण 3.4 ओव्हरमध्ये 27 रन देऊन 3 विकेट घेतल्या.

इथे पाहा VIDEO

Topics mentioned in this article