भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) चे सचिव जय शाह यांची इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलच्या (ICC) संचालकपदी निवड झाली आहे. जय शहा 2019 पासून बीसीसीआयचे सचिव आहेत. त्यांची या पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. 1 डिसेंबर 2024 पासून त्यांची कारकिर्द सुरु होईल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) विद्यमान संचालक ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी समाप्त होत आहे.
नवा रेकॉर्ड
आयसीसीच्या संचालकपदी निवड होताच जय शाह यांनी नवा रेकॉर्ड केला आहे. 35 वर्षांचे जय शाह हे आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण संचालक आहेत. या पदावर निवड झालेले ते पाचवे भारतीय आहेत. यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर या चार भारतीयांनी आयसीसीचं नेतृत्त्व केलं आहे.
( नक्की वाचा : जय शहांनंतर BCCI सचिव कोण होणार? काँग्रेस नेत्यासह महाराष्ट्र भाजपामधील दिग्गजचीही चर्चा )
जय शाह यांचा आयसीसीमधील सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये समावेश होतो. ते सध्या आयसीसीच्या सर्वात प्रभावशाळी अर्थ आणि वाणिज्य विषयाच्या उपसमितीचे प्रमुख होते.