IND vs UAE: सूर्यकुमार यादवची 'खिलाडूवृत्ती', टॉवेलमुळे आऊट झालेल्या खेळाडूला पुन्हा बोलावले, नेमकं काय घडलं?

Junaid Siddique Towel Drop Run Out Controversy: भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील आशिया कप सामन्यात एक अजब घटना पाहायला मिळाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
IND vs UAE : सूर्यकुमार यादवचं खिलाडूवृत्तीमुळे कौतुक होत आहे.
मुंबई:

Junaid Siddique Towel Drop Run Out Controversy: भारत आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) यांच्यातील आशिया कप सामन्यात एक अजब घटना पाहायला मिळाली. भारताने हा सामना सहज जिंकला, पण त्याआधी मैदानात ‘टॉवेल' (Towel) मुळे एका खेळाडूची विकेट जाता-जाता राहिली.

बुधवारी झालेल्या या सामन्यात भारताने UAE ला अवघ्या 57 धावांवर गारद केले. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर शिवम दुबेने 3 विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी 1 विकेट मिळाली.

नेमकं काय घडलं?

UAE च्या इनिंगमधील 13 व्या ओव्हरमध्ये ही घटना घडली. भारताकडून शिवम दुबे ती ओव्हर टाकत होता. दुबे बॉलिंग  करत असताना त्याच्या हातातून एक 'टॉवेल' खाली पडला. त्यावेळी बॅटिंग करत असलेला जुनैद सिद्दीकी क्रीजमध्ये परत न येता त्या  टॉवेलकडे बोट दाखवू लागला.

ही संधी साधत विकेट किपर संजू सॅमसनने चेंडू थेट स्टंप्सवर मारला. टीम इंडियानं अपील केलं आणि तिसऱ्या अंपायरनं (Third Umpire) सिद्दीकीला 'आउट' दिले. पण, भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने अंपायर्सची चर्चा करून हे अपील मागे घेतले. त्यामुळे, सिद्दीकीला जीवदान मिळाले.

Advertisement

( नक्की वाचा : Rinku Singh: ‘वो रोने लगी...' 5 सिक्सने कशी सेट केली प्रिया सरोजसोबतची लव्ह स्टोरी? रिंकूने सांगितली गोष्ट )
 

सूर्याचं सर्वांकडून कौतुक

या घटनेनंतर जुनैद सिद्दीकीने सूर्यकुमार यादवचे आभार मानले. खेळाडूच्या निष्काळजीपणामुळे त्याची विकेट गेली असता, पण भारतीय कॅप्टननं खिलाडूवृत्ती दाखवत त्याला परत खेळण्याची संधी दिली. सूर्यकुमारच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या सामन्यात सिद्दीकीने 22 रन केले.


टीम इंडियाचा दमदार विजय

दरम्यान, दुबई क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात टीम इंडियानं सहज विजय मिळवला. युएईची इनिंग पहिल्यांदा बॅटिंग करताना फक्त 57 रन्सवर संपुष्टात आली. त्यानंतर टीम इंडियानं फक्त 4.3 ओव्हर्समध्ये ही मॅच जिंकली. भारताकडून फक्त अभिषेक शर्मा आऊट झाला. त्यानं 16 बॉलमध्ये 2 फोर आणि 3 सिक्ससह 30 रन्स काढले. 

Advertisement

यापूर्वी कुलदीप यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या बॉलर्सपुढे यूएईनं शरणागती पत्कारली. युएईची संपूर्ण टीम 57 रन्सवरच आटोपली. कुलदीप यादवनं 13 बॉलमध्ये 7 रन्स देत 4 विकेट्स दिल्या. युएईची सुरुवात चांगली होती. पण, नंतर त्यांच्या विकेट्स पडण्यास सुरुवात झाली. नंतरचे बॅटर आले आणि गेले. 

Topics mentioned in this article