भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला त्यावेळी माझे आई-वडिल, KKR च्या खेळाडूचा गौप्यस्फोट! क्रिकेट विश्वात खळबळ

Kolkata Knight Riders All Rounder Moeen Ali : कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर मोईन अलीनं केलेल्या गौप्यस्फोटाची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Kolkata Knight Riders All Rounder Moeen Ali : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावामुळे आयपीएल 2025 (IPL 2025) चा सिझन काही दिवस स्थगित करावा लागला होता. आता पुन्हा एकदा आयपीएलचे सामने सुरु झाले आहेत. आयपीएल पूर्वपदावर आले असतानाच कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर मोईन अलीनं केलेल्या गौप्यस्फोटाची सध्या क्रिकेट विश्वात चर्चा सुरु आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मोईन अलीनं एका पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितले की, भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये 'ऑपरेशन सिंदूर' मोहीम चालवत होते, तेव्हा त्याचे आई-वडील पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये उपस्थित होते. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या परिस्थितीवर बोलताना मोईन अलीने 'बियर्ड बिफोर विकेट' पॉडकास्टवर सांगितले की, 'माझे आई-वडील त्यावेळी काश्मीरमध्ये होते... पाकिस्तानात जिथे हल्ला झाला होता, तिथून फक्त एका तासाच्या अंतरावर... कदाचित थोडे जास्त दूर. त्यामुळे माझ्यासाठी तो एक भीतीदायक अनुभव होता. सुदैवाने ते तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. तिथून एकमेव विमान पकडून ते परत आले. (Moeen Ali reveals his parents were in PoK)

Advertisement

मोईनने भारतातील त्याच्या अनुभवांनाही उजाळा दिला आहे. तो म्हणाला,  'तो भीतीदायक काळ होता, अर्थातच काश्मीरमध्ये हल्ले झाले होते. आम्ही युद्धामध्ये अडकलो आहोत, असे वाटत होतेय. अचानक तुम्ही देशाबाहेर पडण्यासाठी धडपड करत आहात आणि फक्त हे नक्की करत आहात की तुमचे कुटुंब ठीक आहे. लोक तुमच्याबद्दल चिंतित आहेत. त्यांना फक्त हे जाणून घ्यायचे आहे की ते सुरक्षित आहेत की नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Shahid Afridi : पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखानं घेतलं आफ्रिदीचं चुंबन, इम्रान खानची अवस्था विसरला 'लाला'! )
 

मोईनचा फ्लॉप शो

भारत आणि पाकिस्तान यांच्या तणावामुळे स्थगित झालेला आयपीएल सिझन पुन्हा सुरु झाला आहे. सध्या उर्वरित सामने खेळवले जात आहेत. 3 जून रोजी या सिझनची फायनल होईल. मोईन अलीची या सिझनमधील कामगिरी निराशाजनक झाली. मोईननं या सिझनमध्ये 6 सामने खेळला. त्यामध्ये तो फक्त 6 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला. त्याला फक्त 5 रन्सच करता आले. राजस्थान रॉयल्सच्या रियान परागनं त्याच्या एकाच ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स लगावले. 
 

Advertisement
Topics mentioned in this article