KL Rahul Athiya Shetty: केएल राहुल लवकरच होणार बाबा, आथिया शेट्टीनं दिली गुड न्यूज

KL Rahul : टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच बाबा होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

KL Rahul : टीम इंडियाचा क्रिकेटपटू केएल राहुल लवकरच बाबा होणार आहे. राहुल आणि त्याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टी यांनी इन्स्टाग्रामवर एकत्र पोस्ट करुन ही गुड न्यूज जगाला दिली आहे. आथिया ही अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आहे. राहुल आणि आथियाचं लग्न 23 जानेवारी 2023 रोजी झाले होते. राहुल सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात आहे.

योगायोगाची गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियाची टीम 2023 साली भारतामध्ये येण्यापूर्वी राहुलचं लग्न झालं होतं. आता राहुल टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतरच त्यानं ही गोड न्यूज सर्वांसोबत शेअर केली आहे.

Advertisement

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आमचं सर्वात सुंदर वरदान लवकरच येत आहे. 2025 अशी पोस्ट आथिया शेट्टी आणि राहुल यांनी शुक्रवारी संध्याकाळी (8 नोव्हेंबर) शेअर केलीय. ही पोस्ट शेअर होताच फॅन्समध्ये आनंदाचं वातावरण आहे. अनेकांनी राहुल आणि आथियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

पहिल्या टेस्टमध्ये करणार ओपनिंग

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात राहुलची सुरुवात खराब झाली. इंडिया ए विरुद्ध ऑस्ट्रेलिया ए विरुद्धच्या मॅचमधील दोन्ही इनिंगमध्ये तो अपयशी ठरला. पण, त्यानंतरही तो पर्थमध्ये 22 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या इनिंगची ओपनिंग करण्याची शक्यता आहे.

( नक्की वाचा : डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच विराट कोहलीचे 'अच्छे दिन' परत येणार? दोघांमध्ये आहे जबरदस्त कनेक्शन! )

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा पहिली टेस्ट खेळणार नाही. योगायोगाची गोष्ट म्हणजे रोहित शर्मा लवकरच दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मा त्याची पत्नी रितीकासोबत वेळ घालवण्यासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुरुवातीच्या टप्प्यात खेळणार नाही. 
 


Topics mentioned in this article

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world