Lionel Messi Wife : कोण आहे लियोनेल मेस्सीची पत्नी? कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण, प्रेमासाठी केला मोठा त्याग

Who Is Lionel Messi's Wife: भारत दौऱ्यावर मेस्सीच्या पत्नीचीही चर्चा फॅन्समध्ये सुरु आहे. लियोनेल मेस्सीनं 2017 मध्ये त्याची गर्लफ्रेंड ॲन्टोनोला रोक्कुझोशी लग्न केलं. त्यांना 3 मुलं आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Lionel Messi Wife :लिओनेल मेस्सी आणि ॲन्टोनोला रोक्कुझो यांची भेट लहानपणी झाली होती.
मुंबई:

Who Is Lionel Messi's Wife: डिसेंबर महिन्याच्या थंडीत हजारो फॅन्स मध्य रात्री महान फुटबॉलपटून लियोनेल मेस्सीचं स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. मेस्सी तीन दिवसांच्या भारत दौऱ्यात आला आहे. या दौऱ्यात तो चार शहरांना भेट देईल. मेस्सीला जगातील सर्वात महान फुटबॉलपटू मानलं जातं. जगभरात त्याचे लाखो फॅन्स आहेत. मेस्सीच्या प्रत्येक गोष्टीबद्दल त्यांना उत्सुकता असते. भारत दौऱ्यावर मेस्सीच्या पत्नीचीही चर्चा फॅन्समध्ये सुरु आहे. लियोनेल मेस्सीनं 2017 मध्ये त्याची गर्लफ्रेंड ॲन्टोनोला रोक्कुझोशी लग्न केलं. त्यांना 3 मुलं आहेत. 

कोण आहे ॲन्टोनोला रोक्कुझो ?

लियोनेल मेस्सीची पत्नी ही ॲन्टोनोलाची सर्वात मोठी ओळख आहे. पण, त्याचवेळी ती सोशल मीडिया इन्सफ्लूंसर देखील आहे.इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय आहे. ती फिटनेस ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते, ज्यातून तिची मोठी कमाई होती.  

मेस्सीच्या आयुष्यात ती एक मजबूत आधारस्तंभ आहे मेस्सीने एकदा एफसी बार्सिलोनाकडे तिचे कौतुक करताना सांगितलं होतं, की ॲन्टोनोलामधे अनेक चांगल्या गोष्टी आहेत. ती दैनंदिन आयुष्यातील  गोष्टी उत्कृष्टपणे सांभाळते, नेहमी चांगल्या मूडमध्ये असते आणि समस्या खूप चांगल्या प्रकारे हाताळते. ती खूप हुशार आहे.

( नक्की वाचा : Ravindra Jadeja : जडेजाच्या पत्नीनेच केला भारतीय खेळाडूंच्या व्यसनांचा पर्दाफाश; रिवाबांच्या खुलाश्यानं खळबळ )

पहिली भेट ते लग्नापर्यंतचा प्रवास

लिओनेल मेस्सी आणि ॲन्टोनोला रोक्कुझो यांची भेट लहानपणी झाली होती. मेस्सी नंतर त्याच्या खेळाचे प्रशिक्षण घेण्यासाठी अर्जेंटिनातून दूर गेला. पण त्यानंतर दोघं पुन्हा भेटले आणि त्यांचं रूपांतर प्रेमात झाले. मेस्सीसाठी ॲन्टोनोलाने तिच्या अभ्यासाचे मोठे बलिदान दिले. सुरुवातीला रोक्कुझोने डेंटिस्ट्रीची  पदवी घेण्यासाठी शिक्षण सुरू केले होते, मात्र मेस्सीसोबत राहण्यासाठी बार्सिलोनाला गेल्यानंतर तिने Social Communication मध्ये तिचा अभ्यास पूर्ण केला. 

Advertisement

व्हॅनिटी फेअर एस्पानाच्या माहितीनुसार, रोक्कुझोने अर्जेंटिनामधील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ रोसारियोमधून Humanities आणि Social Science मध्ये बॅचलर पदवी मिळवली आणि त्यानंतर डेंटिस्ट्रीमध्ये Postgraduate अभ्यासक्रम सुरू केला. पण, मेस्सीच्या जवळ राहण्यासाठी तिने हा अभ्यास अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला होता.

Advertisement

मेस्सीच्या करिअरमध्ये योगदान

ॲन्टोनोला ही तिच्या नवऱ्याच्या करिअरमध्ये खूप पाठिंबा देते. ती मेस्सीच्या फुटबॉल सामन्यांदरम्यान त्याला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमी उपस्थित असते. 13 डिसेंबर, 2022 रोजी मेस्सी आणि अर्जेंटिनाची राष्ट्रीय फुटबॉल टीम वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचल्यावर तिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर काही दिवसांनी, जेव्हा मेस्सीने 2022 वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा ॲन्टोनोला आणि तिचे तीनही मुलगे स्टँड्समध्ये उपस्थित होते.
 

Topics mentioned in this article