3 months ago

IND vs PAK LIVE: भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज संध्याकाळी 7 वाजता कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये महामुकाबला रंगला. हा  यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना पाहण्यासाठी लाखो क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. हा सामना अतितटीचा होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण भारताने पाकिस्तान विरोधातील हा सामना एकतर्फी खेचला. भारताने पाकिस्तानला 20 षटकांमध्ये 176 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. भारताने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानचे 3 फलंदाज बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. हार्दिक पंड्याने भारतला ब्रेक थ्रू दिला होता. तसच हार्दिकनेच शेवटी विकेट घेत भारताला मोठा विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 18 षटकांमध्ये सर्वबाद 114 धावांपर्यंतच मजल मारली.

Feb 15, 2026 22:22 (IST)

Ind vs Pak Live : भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

Ind vs Pak Live : भारताने पाकिस्तानला 20 षटकांमध्ये 176 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. भारताने सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानचे 3 फलंदाज बाद केले. त्यानंतर पाकिस्तानचे एका पाठोपाठ एक फलंदाज बाद झाले. हार्दिक पंड्याने भारतला ब्रेक थ्रू दिला होता. तसच हार्दिकनेच शेवटी विकेट घेत भारताला मोठा विजय मिळवून दिला. पाकिस्तानने 18 षटकांमध्ये सर्वबाद 114 धावांपर्यंतच मजल मारली.

Feb 15, 2026 22:11 (IST)

Ind vs Pak Live : पाकिस्तानचे 9 फलंदाज बाद, भारत विजयाच्या दिशेनं

Ind vs Pak Live : भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांची पुरती दाणादाण उडवली आहे. पाकिस्तानचे 16 षटकांमध्ये 9 फलंदाज बाद झाले आहेत. 16 षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 102 वर पोहोचली आहे. 

Advertisement
Feb 15, 2026 21:45 (IST)

Ind vs Pak Live : अक्षर पटेलने उस्मान खानला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, 7 फलंदाज बाद

बाबर आझम बाद झाल्यानंतर पाकिस्तानचा फलंदाज उस्मान खान सावध खेळी करून पाकिस्तानची धावसंख्या वाढवत होता. परंतु, अक्षरच्या गोलंदाजीवर तो 44 धावांवर बाद झाला. 11 षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 78-6 अशी झाली आहे. कुलदीपने मोहम्मद नवाजला 4 धावांवर बाद केलं. त्यानंतर तिलक वर्माने शादाब खानला 14 धावांवर बाद केलं, पाकिस्तानची पुरती दाणादाण उडाली असून 13 षटकांमध्ये 84 धावांवर सात बाद झाले आहेत.

Feb 15, 2026 21:32 (IST)

Ind vs Pak Live : 8 षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या किती?

पाकिस्तानचे चार फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर त्यांच्या संघाची धावसंख्या मंदावली आहे. पाकिस्तानची 8 षटकानंतर 57-4 अशी धावसंख्या झाली आहे.उस्मान खान आणि शादाब खान पाकिस्तानची कमान सांभाळत आहेत. 

Feb 15, 2026 21:20 (IST)

Ind vs Pak Live :बाबर आझम बाद, पाच षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या किती?

Ind vs Pak Live : सुरुवातीच्या दोन षटकांमध्ये पाकिस्तानला तीन मोठे धक्के बसले. फऱ्हान, सईम, कर्णधार सलमान अघा स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मैदानात उतरलेला पाकिस्तानचा स्टार फलंदाज बाबर आझमही फक्त 5 धावांवर बाद झाला. अक्षर पटेलने बाबर आझमला पॅव्हेलिनयचा रस्ता दाखवला. पाच षटकानंतर पाकिस्तानची धावसंख्या 36-4 झाली आहे.

Feb 15, 2026 20:56 (IST)

Ind vs Pak Live :पाकिस्तानचे 3 फलंदाज स्वस्तार माघारी, भारताची दमदार सुरुवात, पाहा व्हिडीओ

पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज साहिबजादा फऱ्हान शुन्यावर बाद झाला.हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात भारताला मोठा ब्रेक थ्रू दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराहने सईम अयुबला सहा धावांवर बाद केलं. त्यानंतर बुमराहने भेदक मारा करून त्याच षटकात कर्णधार सलमान आगाला बाद केलं. 3 षटकानंतर पाकिस्तानचा स्कोअर 21 वर 3 बाद असा आहे.

Advertisement
Feb 15, 2026 20:41 (IST)

Ind vs Pak Live : भारताने पाकिस्तानला दिलं मोठं आव्हान, किती धावांचं टार्गेट?

Ind vs Pak Live : भारताने 20 षटकांमध्ये 7 बाद 175 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला विजयासाठी 176 धावांचं लक्ष्य गाठावं लागणार आहे. भारतासाठी इशान किशनने (77),अभिषेक शर्मा (0),तिलक वर्मा (25),कर्णधार सूर्यकुमार यादव (32),शिवम दुबे (27) तर रिंकु सिंगने नाबाद 11 धावा केल्या. हार्दिक पंड्यालाही भोपळा फोडता आला नाही.

Feb 15, 2026 20:17 (IST)

Ind vs Pak Live : तिलक पाठोपाठ हार्दिक पंड्या झाला बाद

भारताचा स्टार फलंदाज तिलक वर्मा 25 धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या शुन्यावर बाद झाला.  17 षटकानंतर भारताची धावसंख्या 4 बाद 140 धावांवर पोहोचली आहे.

Advertisement
Feb 15, 2026 20:10 (IST)

Ind vs Pak Live :14 षटकानंतर भारताची धावसंख्या किती?

Ind vs Pak Live : इशान किशन 77 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने सावध खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. 14 षटकानंतर भारताची धावसंख्या 2 बाद 125 वर पोहोचली आहे.

Feb 15, 2026 19:59 (IST)

Ind vs Pak Live : इशाननंतर तिलक-सूर्या तळपळा, भारत शंभरी पार

Ind vs Pak Live :  इशान किशन 77 धावांवर बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माने सावध खेळी करून पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. 13 षटकानंतर भारताची धावसंख्या 2 बाद 118 वर पोहोचली आहे.

Feb 15, 2026 19:45 (IST)

Ind vs Pak Live : इशान किशन 77 धावांवर बाद, कोणाला मिळाली विकेट?

Ind vs Pak Live : भारताचा डावखुरा स्टार फलंदाज इशान किशन 77 धावांवर बाद झाला. पाकिस्तानचा गोलंदाज सयम अयुबने त्याला क्लिन बोल्ड केलं. त्याने 40 चेंडूत 77 धावा केल्या. इशानने 10 चौकार आणि 3 षटकार ठोकले. 9 षटकानंतर भारताची धावसंख्या दोन बाद 89 वर पोहोचली आहे. 11 षटकानंतर भारताची धावसंख्या 2 बाद 98 वर पोहोचली आहे.

Feb 15, 2026 19:37 (IST)

Ind vs Pak Live : इशान किशनचा मैदानात चौकार षटकारांचा पाऊस,पाहा व्हिडीओ

Ind vs Pak Live : अभिषेक शर्मा बाद झाल्यानंतर इशान किशनने धडाकेबाज फलंदाजी करून 27 चेंडूत अर्धशतक ठोकलं. इशानने मैदानात चौकार षटकारांचा पाऊस पाडला. आठ षटकानंतर भारताची धावसंख्या 82 वर पोहोचली असून इशान 72 धावांवर नाबाद खेळत आहे. 

Feb 15, 2026 19:16 (IST)

Ind vs Pak Live : इशान किशनची तुफान फटकेबाजी, 27 चेंडुत दमदार फिफ्टी

Ind vs Pak Live : पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाने अभिषेक शर्माला भोपळाली फोडू दिला नाही. परंतु, भारताचा डावखुरा फलंदाज इशान किशनने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरु केली आहे. इशानने जबरदस्त षटकार चौकार ठोकून भारताची धावसंख्या वाढवली आहे. इशानने 27 चेंडूत 50 धावा कुटल्या. इशानने दमदार अर्धशतक केलं आहे. आठ षटकानंतर भारताची धावसंख्या एक बाद 82 धावांवर पोहोचली आहे.

Feb 15, 2026 19:07 (IST)

Ind vs Pak Live : भारताला पहिला मोठा धक्का, अभिषेक शर्मा बाद

Ind vs Pak Live : पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघाने फिरकी गोलंदाजीने इनिंगची सुरुवात केली. सलमानने भेदक गोलंदाजी करून भारताचा हुकमी फलंदाज अभिषेक शर्माला बाद केलं. अभिषेक 4 चेंडूत 0 धावा करून बाद झाला. भारतासाठी हा मोठा धक्का आहे. 3 षटकानंतर भारताची धावसंख्या 1 बाद 25 झाली आहे.

Feb 15, 2026 18:42 (IST)

Ind vs Pak Live : नाणेफेकीनंतर दोन्ही कर्णधारांनी हस्तांदोलन केलं का?

भारत-पाकिस्तानचा महामुकाबला थोड्याच वेळात कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये सुरु होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी मैदानात उतरले. पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अघासोबत हस्तांदोलन केलं नाही.

Feb 15, 2026 18:39 (IST)

Ind vs Pak Live : पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय

Ind vs Pak Live : पाकिस्तानचा नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताला प्रथम फलंदाजीच करायची होती, असं भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने म्हटलं आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या संघात कोणताही बदल करण्यात आला नाही. थोड्याच वेळात दोन्ही संघाचा थरार सुरु होणार आहे. 

Feb 15, 2026 18:32 (IST)

Ind vs Pak Live : नाणेफेक करताना दोन्ही कर्णधार हात मिळवणार का? नवी अपडेट समोर

Ind vs Pak Live : भारत-पाकिस्तानचा महामुकाबला थोड्याच वेळात कोलंबोच्या प्रेमादासा स्टेडियममध्ये सुरु होणार आहे. तत्पूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेक करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर दोन्ही कर्णधार हात मिळवणी करणार नाहीत. दरम्यान, भारतीय संघात दोन मोठे बदल करण्यात आले आहेत. संजू सॅमसनच्या जागेवर अभिषेक शर्मा, तर अर्शदीप सिंगच्या जागी कुलदीप यादव मैदानात उतरणार आहेत. 

Feb 15, 2026 18:07 (IST)

Ind vs Pak Live : भारत-पाकिस्तानचा संघ स्टेडियमबाहेर दाखल, नवा व्हिडीओ आला समोर

Ind vs Pak Live : भारत-पाकिस्तान सामना थोड्याच वेळात सुरु होणार असून दोन्ही संघाचे खेळाडू स्टेडियमबाहेर पोहोचले आहेत. स्टेडियमबाहरे भारतीयांसह पाकिस्तानचे क्रिकेटप्रेमी हजारोंच्या संख्येत उपस्थित आहेत. दोन्ही देशातील चाहत्यांनी आपापल्या देशातील खेळाडूंचं मनोबल वाढवण्यासाठी पोस्टरबाजीही केली आहे. 

Feb 15, 2026 17:04 (IST)

Ind vs Pak Live : भारत-पाकिस्तान सामन्यात पाऊस पडणार का?

Ind vs Pak Live : भारत पाकिस्तान हाय व्हिल्टेज सामन्यावर पावसाचं सावट आहे. या सामन्यात पाऊस खोडा घालण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. श्रीलंकेच्या हवामान विभागाने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. रिपोर्ट्नुसार, आता मैदानात पाऊस पडत नाहीय.मैदानात उष्ण हवामान आहे. परंतु, आकाशात काळे ढग डोकं वर काढून आहेत. त्यामुळे पाचनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Feb 15, 2026 16:55 (IST)

Ind vs Pak Live : सामन्याआधी उस्मान तारिकच्या गोलंदाजीचे व्हिडीओ होतायत व्हायरल

Ind vs Pak Live : भारत-पाकिस्तान सामन्याआधी उस्मान तारिकच्या गोलंदाजीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. भारतीय फलंदाजांना बाद करण्यासाठई तारिकनेही कंबर कसली आहे. आता भारतीय फलंदाज तारीकचा मैदानात कसा समाचार घेतात, याची उत्सुकता अनेक क्रिकेट प्रेमींना लागली आहे.

Feb 15, 2026 16:47 (IST)

Ind vs Pak Live : पाकिस्तान विरोधातीत सामन्यासाठी भारतीय संघात दोन मोठे बदल

Ind vs Pak Live : संजू सॅमसन संघातून बाहेर झाला असून त्याच्या जागेवर भारताचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने एन्ट्री मारली आहे. तर अर्शदीप सिंगच्या जागेवर भारताचा दिग्गज फिरकीपटू कुलदीप यादव मैदानात उतरणार आहे.