आयपीएल 2025 पूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. मेगा ऑक्शनमध्ये सर्व टीमची रचना बदलून जाते. आगामी मेगा ऑक्शनपूर्वी किती खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी मिळणार हे बीसीसीआयनं अद्याप जाहीर केलेलं नाही. त्यापूर्वीच कोणता खेळाडू कुठं जाणार? याची चर्चा सुरु झाली आहे. पाच वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारी मुंबई इंडियन्स ही या चर्चेची केंद्रबिंदू आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये टीम इंडियाचा सध्याचा T20 कॅप्टन सूर्यकुमार यादव, T20 वर्ल्ड कप विजेता कॅप्टन रोहित शर्मा, मुंबई इंडियन्सचा सध्याचा कॅप्टन हार्दिक पांड़्या आणि प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराह हे चार प्रमुख भारतीय खेळाडू आहेत. बुमराहनं देखील यापूर्वी भारतीय टीमचं नेतृत्त्व केलं आहे. यापैकी कोणत्या खेळाडूंना मुंबई इंडियन्स रिटेन करणार? कुणाला सोडणार? याची सर्वांनाच उत्सुकता आहे.
रोहित शर्मा LSG कडून खेळणार?
मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा आगामी सिझन लखनौ सुपर जायंट्सकडून (LSG) खेळणार असून त्यासाठी फ्रँचायझीनं 50 कोटींचं बजेट निश्चित केलं आहे, अशी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. लखनौ सुपरजायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी एका मुलाखतीमध्ये या चर्चेवर स्पष्टीकरण दिलं आहे.
( नक्की वाचा : आधी धोनीला कॅप्टनपदावरुन काढलं आता राहुलवर भडकले! कोण आहेत LSG चे मालक संजीव गोयंका? )
रोहित शर्मा ऑक्शनचा भाग असेल की नाही हे तुम्हाला माहिती आहे का? हे मला सांगा. ही सर्व चर्चा विनाकारण होत आहे. मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार की नाही? तो ऑक्शनचा भाग असेल की नाही, हे अद्याप माहिती नाही. तो ऑक्शनमध्ये आला तरी तुम्ही तुमच्या एकूण बजेटचा 50 टक्के हिस्सा एका खेळाडूवर खर्च कराल तर बाकीच्या 22 खेळाडूंना कसं मॅनेज करणार? कुणाला खरेदी करायचं याबाबत प्रत्येक फ्रँचायझीची आवड असते. अन्य फ्रँचायझींनाही तो खेळाडू त्यांच्या टीममध्ये हवा असेल,' असं गोयंका यांनी स्पष्ट केलं.
असा प्रश्न गोयंका यांनी हे उत्तर दिल्यानंतर रोहित शर्मा तुमच्या विशलिस्टमध्ये आहे का? असा थेट प्रश्न त्यांना पुन्हा एका या मुलाखतीच्या दरम्यान विचारण्यात आला. त्यावर गोयंका म्हणाले, 'प्रत्येकाचीच विशलिस्ट असते. आपल्या टीममध्ये सर्वोत्तम खेळाडू, सर्वश्रेष्ठ कॅप्टन हवा असं प्रत्येकालाच वाटत. तुमच्याकडं काय आहे आणि काय उपलब्ध आहे? तुम्ही त्याबाबत काय करु शकता हे महत्त्वाचं आहे. मला कुणीही हवं असू शकतं, ही गोष्ट प्रत्येक फ्रँचायझींना लागू आहे. पण, तुम्हाला प्रत्येक जण मिळणार नाही,' असं त्यांनी सांगितलं.