MI vs SRH: सचिन अन् रोहितसह मुंबईच्या कोणत्याही दिग्गजला जमलं नाही ते झालं!19 वर्षांच्या इतिहासात...

MI vs SRH, IPL 2026:  आयपीएल 2026 मध्ये  बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला.

जाहिरात
Read Time: 3 mins
MI vs SRH, IPL 2026: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूनं या सामन्यात एका नव्या रेकॉर्डची नोंद केली.
मुंबई:

MI vs SRH, IPL 2026:  आयपीएल 2026 मध्ये  बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 5 आऊट 243 रन्स केले होते. सनरायझर्स हैदराबादनं 244 रन्सचं आव्हान यशस्वीपणे पार केलं.  हेनरिक क्लासेनने मुंबई इंडियन्सच्या हातून हा सामना खेचून आणला. त्याने 30 चेंडूत 65 धाव ठोकल्या. 19 व्या ओव्हर मध्येच हैदराबादने हे लक्ष पूर्ण केले.  8 बॉल्स आणि 6 गडी राखून हैदराबादने मुंबईचा पराभव केला. 

 यांच्यात झालेल्या लढतीत एका नव्या रेकॉर्डची नोंद झाली. मुंबई इंडियन्सचा दक्षिण आफ्रिकन बॅटर रियान रिकल्टन यानं हैदराबादच्या बॉलर्सची अक्षरशः पळता भुई थोडी केली. रिकल्टनने वादळी बॅटिंग करत नाबाद 123 रन कुटले. हे त्याचं आयपीएल करिअरमधील पहिलं शतक ठरलं. विशेष म्हणजे या खेळीसह त्यानं असा पराक्रम केला जो गेल्या 19 वर्षांत सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांनाही जमला नाही.

सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा

रिकल्टनने इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरमध्येच त्याचा मुड स्पष्ट केला होता. प्रफुल हिंगेच्या पहिल्याच बॉलवर त्यानं उत्तुंग सिक्स ठोकून त्याच्या खेळीची सुरुवात केली. त्याची ही फटकेबाजी डावाच्या शेवटच्या बॉलपर्यंत कायम होती. रिकल्टनने अवघ्या 55 बॉल्समध्ये 10 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने नाबाद 123 रनची खेळी साकारली. त्याच्या या शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 243 रनचा डोंगर उभा केला.

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2026 : मैदानात अनर्थ घडला, पण पुढच्या 11 मिनिटांत जे झालं तो चमत्कारच! एन्गिडीसाठी दिल्ली पोलिसांनी... )

मुंबई इंडियन्ससाठी रचला इतिहास

या नाबाद शतकासह रियान रिकल्टनने मुंबई इंडियन्सच्या इतिहासात आपलं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं आहे. रिकल्टनने आपलं शतक अवघ्या 44 बॉल्समध्ये पूर्ण केलं. यासह तो मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणारा बॅटर बनला आहे. रिकल्टनने श्रीलंकेचा दिग्गज सनथ जयसूर्याचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड मोडीत काढला. जयसूर्याने 2008 मध्ये 45 बॉल्समध्ये सेंच्युरी झळकावली होतं.

मुंबईसाठी सर्वात वेगवान सेंच्युरी ठोकणारे टॉप 5 बॅटर्स

रिकल्टनच्या या खेळीनंतर मुंबई इंडियन्ससाठी सर्वात कमी बॉल्समध्ये शतक पूर्ण करणाऱ्या बॅटर्सची यादी आता बदलली आहे. यामध्ये रिकल्टन आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

44 बॉल्स - रियान रिकल्टन - विरुद्ध हैदराबाद (2026)
45 बॉल्स - सनथ जयसूर्या - विरुद्ध चेन्नई (2008)
45 बॉल्स - तिलक वर्मा - विरुद्ध गुजरात  (2026)
47 बॉल्स - कॅमरून ग्रीन - विरुद्ध हैदराबाद (2023)
49 बॉल्स - सूर्यकुमार यादव - विरुद्ध गुजरात  (2023)

रिकल्टनने दाखवून दिलं की मुंबई इंडियन्सने त्याच्यावर ओपनर म्हणून जो विश्वास दाखवला, तो सार्थ होता. त्याच्या या खेळीमुळे वानखेडेवर उपस्थित असलेल्या चाहत्यांना पैसा वसूल परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आता हैदराबादचे बॅटर्स या 244 रनच्या लक्ष्याचा पाठलाग कसा करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article