Moin Khan: 'भारतीय खेळाडूंबरोबर मैत्री करू नका' मोईन खानचा विरोध का? कारण ऐकून हैराण व्हाल

त्यांच्या या विधानाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने हे विधान केले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Moin Khan Warning To Pakistan Players: चॅम्पियन ट्रॉफीच्या आधी पाकिस्तानचा माजी कर्णधार मोईन खान याने एक मोठे विधान केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय त्याच्या विधानाने अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहेत. पाकिस्तानी खेळाडूंनी भारतीय खेळाडूं बरोबर मित्रत्वाचे संबध ठेवू नयेत. त्यांच्या या विधानाने क्रिकेट जगतात खळबळ उडाली आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने हे विधान केले आहे. ज्या वेळी मी भारत आणि पाकिस्तानची मॅच पहातो, त्यावेळी मला एक गोष्ट लक्षात येत नाही की आमचे खेळाडू भारतीय खेळाडुंची बॅट का तपासत असतात? त्यांच्या पाठीवर  थापा का मारतात? त्यांच्या बरोबर मैत्रीपुर्ण चर्चा का करतात? असा प्रश्न मोईन खान याने उपस्थित केले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 53 वर्षाच्या मोईन खानने पुढे असंही म्हटलं आहे की विरोधी संघाच्या खेळाडूांचा सन्मान राखला पाहीजे. त्याच्या विरोधात आपण नाही. पण जास्त मैत्री ही चांगली नाही असं स्पष्ट मतही त्याने व्यक्त केले आहे. यावेळी त्याने आपण खेळत असताना त्यावेळच्या वरिष्ठ खेळाडूंनी काही टीप्स दिल्याचे सांगितले. भारता विरुद्ध खेळताना कोणत्या ही गोष्टीची तक्रार करू नका. शिवाय मैदानात त्यांच्या बरोबर जास्त बोलण्याचीही गरज नाही. ज्यावेळी त्यांच्या बरोबर आपण मैत्रीने वागतो त्यावेळी ते आपल्याला कमजोर समजतात असंही मोईन खान म्हणाला. 

ट्रेंडिंग बातमी - Champions Trophy : Opening Ceremony साठी रोहित शर्मा पाकिस्तानात जाणार? मोठी अपडेट आली समोर

लवकरच भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट संघ एकमेकां विरोधात भिडणार आहेत. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये हे दोन संघ एकमेका विरोधात असतील. दोन्ही संघातला महत्वाचा सामना 23 फेब्रुलारीला दुबईत होणार आहे. हा सामना दुबई इंटरनॅश्नल क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. लीग मॅचमध्ये जर हे दोन्ही संघ चांगले खेळले तर पुढे नॉक आऊटमध्ये ही या दोन्ही संघाचा सामना होवू शकतो. भारताने आपला संघ जाहीर केला आहे. पाकिस्ताननेही आपला संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी जाहीर केलाय. 

Advertisement