MS Dhoni Ex Business Partner Arrested: टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा मित्र आणि बिझनेस पार्टनर मिहीर दिवाकरला जयपूर पोलिसांनी अटक केली आहे. धोनीनंच दिवाकरच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत त्याला बुधवारी (10 एप्रिल) रात्री नोएडाच्या सेक्टर-16 मधून ताब्यात घेतलं आहे.
काय आहे प्रकरण?
या प्रकरणात मिहीर दिवाकरवर महेंद्रसिंह धोनीची 15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. 2017 साली धोनीनं दिवाकर आणि त्याची पत्नी सौम्या विश्वास यांच्या मालकीच्या आरका स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट कंपनीत गुंतवणूक केली होती. त्याचबरोबर धोनी त्यांचा भागीदार बनला. धोनीचा या कंपनीसोबत देशात आणि विदेशात क्रिकेट अकादमी उघडण्याचं निश्चित झालं होतं.
ही कंपनी धोनीला नफ्यातील रक्कम देण्यास उत्तदायी होती. पण, त्यांनी याबाबतच्या नियम आणि अटींचं उल्लंघन केलं. त्याचबरोबर या कंपनीनं धोनीला कल्पना न देता क्रिकेट अकादमी सुरु केली आणि त्याला नफ्यातील हिस्सा दिला नाही, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
हार्दिक पांड्याच्या भावाला मुंबई पोलिसांनी केली अटक
धोनीचे वकील दयानंद सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीला देण्याीत आलेलं अधिकारपत्र 2021 सालीच रद्द करण्यात आलं होत. त्यानंतरही त्यांनी धोनीच्या नावावर क्रिकेट अकादमीची स्थापना केली. त्याबाबत धोनीलाकोणतीही कल्पना दिली नाही तसंच त्याला कोणतीही फीस दिली नाही. या कंपनीला करारातील नियमांचं उल्लंघन केल्यानं धोनीला जवळपास 15 कोटींचं नुकसान झालंय, असा आरोप त्याच्या वकिलांनी केलाय.
टीम इंडियाकडून खेळलाय मिहीर
धोनीच्या तक्रारीवरुन जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेला मिहीर दिवाकर हा देखील माजी क्रिकेटपटू आहे. तो 2000 साली झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कपमधील भारतीय टीमचा सदस्य होता. तो 39 फर्स्ट क्लास, 37 लिस्ट A आणि 7 टी20 सामने खेळला आहे.