World Record : 15 फोर आणि 11 सिक्स ! 17 वर्षांच्या मुंबईकरनं उडवली सर्व आयपीएल टीमची झोप

Ayush Mhatre Break World Record : मुंबईकर आयुष म्हात्रेनं लिस्ट A क्रिकेटमधील मोठा विक्रम रचलाय.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Ayush Mhatre Break World Record in Vijay Hazare Trophy: मुंबईकर आयुष म्हात्रेनं लिस्ट A क्रिकेटमधील मोठा विक्रम रचलाय. 17 वर्षांचा आयुष क्रिकेटच्या एका प्रकारातील एका इनिंगमध्ये 150 रन करणारा सर्वात तपुण खेळाडू बनला आहे. मुंबई विरुद्ध नागालँड या मॅचमध्ये आयुष ओपनिंगला उतरला होता. त्यानं फक्त 117 बॉलमध्ये 181 रनची वादळी खेळी केली. यावेळी त्यानं मुंबईकर यशस्वी जैस्वालचा रेकॉर्ड मोडला. या वर्षाच्या सुरुवातीला शेष भारताविरुद्धच्या मॅचमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या आयुषयनं अगदी कमी कालावधीमध्ये क्रिकेट जगतामध्ये स्वत:चा ठसा उमटवला आहे. 

मोदी स्टेडियमवर आयुषचं वादळ

31 डिसेंबरला म्हणजे 2024 मधील शेवटच्या दिवशी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मुंबई विरुद्ध नागालँड हा सामना सुरु आहे. या सामन्यात नागालँडनं मुंबईला पहिल्यांदा बॅटींग करण्याचं निमंत्रण दिलं. मुंबईकडून आयुष म्हात्रे आणि अंगक्रिष रघुवंशी (AngKrish Raghuvanshi) यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 156 रन्सची पार्टरनरशिप केली. रघुवंशी 56 रन काढून आऊट झाला.

आयुषनं त्यानंतरही आक्रमक बॅटिंग सुरु ठेवत लिस्ट ए क्रिकेटमधील पहिली सेंच्युरी झळकावली. त्यानंतर पाहता-पाहता 150 रनचा टप्पाही ओलांडला. त्याची डबल सेंच्युरी 19 रन्सनी हुकली. त्यानं 117 बॉलमध्ये 15 फोर आणि 11 सिक्ससह 181 रन काढले. यामध्ये त्याचा स्ट्राईक रेट 154.70 इतका होता. आयुषच्या या खेळीमुळे मुंबईनं निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 7 आऊट 403 रन्सचा डोंगर उभारला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

यशस्वीचा मोडला रेकॉर्ड

17 वर्ष 168 दिवस वय असलेला आयुष लिस्ट ए क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 150 रनचा टप्पा ओलांडणारा सर्वात कमी वयाचा भारतीय बनला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड मुंबईच्याच यशस्वी जैस्वालच्या नावावर होता. यशस्वीनं 2019 साली झारखंड विरुद्ध 17 वर्ष 291 दिवस वय असताना हा विक्रम केला होता. 

Advertisement

लिस्ट A क्रिकेटमधील एका इनिंगमध्ये 150+ रन करणारे लहान वयाचे भारतीय

17 वर्ष 168 दिवस - आयुष म्हात्रे ( मुंबई)
17 वर्ष 291 दिवस - यशस्वी जैस्वाल (मुंबई)
19 वर्ष 63 दिवस - रॉबिन उथप्पा (कर्नाटक)

Advertisement

( नक्की वाचा :  Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )

IPL टीमची उडवली झोप

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पदार्पणापासूनच आयुष म्हात्रेची चर्चा आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीलाही त्यानं प्रभावित केलं होतं, असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल ऑक्शनपूर्वी आयुषची ट्रायल देखील घेतली होती. पण, आयपीएल ऑक्शनमध्ये सीएसकेनं त्याच्यावर बोली लावली नाही. 

Advertisement

( नक्की वाचा : Vinod Kambli Dance : 'चक दे इंडिया' गाण्यावर नाचला विनोद कांबळी, हॉस्पिटलमध्येही जोश कायम, Video )

सीएसकेसह कोणत्याही टीमनं त्याच्यावर बोली लावली नाही. त्यामुळे आयुष्य आयपीएल ऑक्शनमध्ये अनसोल्ड गेला. पण, विजय हजारे ट्ॉफीतील या वादळी खेळीनं आयुषनं पुन्हा एकदा सर्व आयपीएल फ्रँचायझींचं लक्ष वेधून घेतलं असेल. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये ऐनवेळी बदली खेळाडू म्हणून आयुषची एन्ट्री होऊ शकते.

Topics mentioned in this article