आयपीएल सुरु असतानाच मुंबई इंडियन्सनं बदलला एक खेळाडू

जाहिरात
Read Time: 1 min
अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूचा मुंबई इंडियन्समध्ये समावेश करण्यात आला आहे.
मुंबई:

IPL 2024 Mumbai Indians : आयपीएल पॉईंट टेबलमध्ये सध्या तळाशी असलेल्या मुंबई इंडियन्सनं एक महत्त्वाची घोषणा केली आहे. मुंबईनं सौराष्ट्रचा विकेट किपर हार्विक देसाईचा (Harvik Desai) टीममध्ये समावेश केलाय. दुखापतग्रस्त विष्णू विनोदच्या (Vishnu Vinod) जागी हार्विकचा समावेश केला आहे. विष्णूच्या डाव्या हाताला दुखापत झाल्यानं को हा सिझन खेळू शकणार नाही, असं मुंबई इंडियन्सनं स्पष्ट केलंय.  

कोण आहे हार्विक?

2018 मधील अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणाऱ्या टीमचा सदस्य असलेला हार्विक सौराष्ट्राचा खेळाडू आहे. त्यानं आत्तापर्यंत 46 फर्स्ट क्लास मॅचमध्ये 33.64 च्या सरासरीनं 2658 रन केले आहेत. तर 27 टी20 सामन्यात 134.17 च्या स्ट्राईक रेटनं 691 रन केले आहेत. यामध्ये 1 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. यावर्षी झालेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेत त्यानं 8 मॅचमध्ये 30.46 च्या सरासरीनं 396 रन केले आहेत. 

Advertisement

पाचवेळा आयपीएल स्पर्धा जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सनं या सिझनमध्ये कॅप्टन बदललाय. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडं टीमचं नेतृत्त्व सोपवलंय. हार्दिकच्या कॅप्टनसीमध्ये मुंबईची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिले तीन सामने गमावले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध विजय मिळवला. 
 

Topics mentioned in this article