IPL 2025: मुंबई इंडियन्स यंदा राहणार ट्रॉफीपासून दूर, 'हा' विचित्र योग आहे कारण!

IPL 2025 Playoff : लाखो क्रिकेट फॅन्सची आवडती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुन्हा एकदा विजेतेपदाच्या जवळ आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

IPL 2025 Playoff : लाखो क्रिकेट फॅन्सची आवडती मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) पुन्हा एकदा विजेतेपदाच्या जवळ आहे. त्यांनी आयपीएलच्या अठराव्या हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. खराब सुरुवातीनंतर मुंबई इंडियन्सनं ही कामगिरी केलीय. त्यामुळे त्यांचे फॅन्स सध्या आनंदात आहेत. पण, त्यांना नको वाटणारा योग यंदा जुळून आला आहे. त्यामुळे सहाव्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं मुंबईचं स्वप्न यंदा अपूर्ण राहू शकतं. 

आयपीएलच्या इतिहासात जेव्हा-जेव्हा मुंबई इंडियन्सचा संघ तिसऱ्या किंवा चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे, तेव्हा-तेव्हा त्यांना ट्रॉफी जिंकण्यात अपयश आले आहे. यावेळी देखील हार्दिक पांड्याच्या टीमनं चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्रता मिळवली आहे. यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा अपयशाची भीती वाटू लागली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

मागील अपयशाचा इतिहास

मुंबई इंडियन्स संघाने पहिल्यांदा 2011 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता.  पण त्यांचे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न, स्वप्नच राहिले. त्यानंतर, 2012 आणि 2014 मध्ये देखील मुंबई इंडियन्सनं चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला.  परंतु या दोन्ही वेळीही त्यांना विजेतेपदापासून वंचित राहावे लागले.

एमआय संघाने चौथ्यांदा 2023 मध्ये पुन्हा एकदा तिसऱ्या स्थानावर राहून प्लेऑफमध्ये प्रवेश केला. 'हिटमॅन' शर्मा यांच्या नेतृत्वाखाली संघ हा लाजिरवाणा विक्रम मोडत विजेतेपद पटकावेल अशी चाहत्यांना अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही आणि त्यांना बाद फेरीच्या सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.

Advertisement

( नक्की वाचा : Mumbai Indians : तळाची मुंबई इंडियन्स टॉपला कशी पोहोचली? वाचा विजयी सिक्सर्सचे 6 प्रमुख कारणं )
 

दोन वर्षांनंतर पुन्हा तोच योगायोग

आता मुंबई इंडियन्स संघ पाचव्यांदा चौथ्या स्थानावर राहून प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात यशस्वी झाला आहे. यावेळी हार्दिक पांड्या त्यांच्या टीमचा कॅप्टन आहे. आता हार्दिकच्या नेतृत्त्वाखाली फ्रँचायझी हा रेकॉर्ड मोडणार की  मागच्या वेळेप्रमाणेच यावेळीही त्यांना निराशा हाती सहन करावी लागेल हे पाहणे महत्त्वाचं आहे.  

Topics mentioned in this article