बांगलादेशनं बदलला 22 वर्षांचा इतिहास, घरात घुसून पाकिस्तानला लोळवलं!

Bangladesh First Test Series Win vs Pakistan:  बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज 2-0 नं जिंकत इतिहास घडवला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
B
मुंबई:

Bangladesh First Test Series Win vs Pakistan:  बांगलादेशनं पाकिस्तान विरुद्धची दोन टेस्ट मॅचची सीरिज 2-0 नं जिंकत इतिहास घडवला आहे. बांगलादेशनं आजवर पाकिस्तानविरुद्ध एकही टेस्ट सीरिज जिंकलेली नव्हती. तब्बल 22 वर्षांचा दुष्काळ त्यांनी अखेर संपवला. 

बांगलादेशनं पहिल्या टेस्टमध्ये पाकिस्तानचा 6 विकेट्सनं पराभव केला. त्यापाठोपाठ पावसाचा अडथला आलेली दुसरी टेस्ट 6 विकेट्सनं जिंकून पाकिस्तानी नाचक्की केली. क्रिकेट विश्वात कमकुवत मानल्या जाणाऱ्या या टीमनं पाकिस्तानचा त्यांच्याच घरच्या मैदनात सपशेल पराभव केला आहे. दोन्ही देशांमध्ये 2002 साली पहिल्यांदा टेस्ट सीरिज झाली होती. त्यानंतर आजवर त्यांच्यात 6 टेस्ट सीरिज झाल्या आहेत. त्या सर्व सीरिज पाकिस्ताननं जिंकल्या होत्या. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कशी जिंकली दुसरी टेस्ट?

रावळपिंडीमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये टॉस गमावल्यानंतर पाकिस्तानची टीम पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरली. यजमान टीमला पहिल्या इनिंगमध्ये 274 रन करता आले. त्याला उत्तर देताना बांगलादेशची पहिली इनिंग 262 रनवर संपुष्टात आली. पाकिस्तानला दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त 172 रन करता आले. बांगलादेशनं विजयासाठी आवश्यक 185 रन चार विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करत ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब केलं. 

Advertisement

बांगलादेशनं परदेशात जिंकलेली ही तिसरी टेस्ट सीरिज आहे. यापूर्वी त्यांनी 2009 साली वेस्ट इंडिजचा 2-0 नं पराभव केला होता. त्यानंतर 12 वर्षांनी झिम्बाब्वेचा 1 टेस्टमध्ये पराभव केला होता. बांगलादेशनं विदेशात जिंकलेली ही आठवी टेस्ट मॅच आहे. त्यांनी आत्तापर्यंत वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांना प्रत्येकी 2 वेळा तर श्रीलंका आणि न्यूझीलंडचा 1-1 वेळा पराभव केला आहे. 

( नक्की वाचा : रिझवानची डबल सेंच्युरी रोखण्यासाठी कॅप्टननं केला कट? पाकिस्तानच्या खेळाडूचा मोठा दावा... )
 

पाकिस्तानची घसरण कायम

दुसरिकडं पाकिस्तानला त्यांच्या होम ग्राऊंडवर गेल्या 10 टेस्टमध्ये विजय मिळवता आलेला नाही. यामधील 6 टेस्ट त्यांनी गमावल्या असून 4 ड्रॉ झाल्या आहेत. ही सीरिज संपल्यानंतर WTC 2023-25 पॉईंट टेबलमध्ये बांगलादेश चौथ्या तर पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article