T20 World Cup 2026, Pakistan vs Netherlands : T20 वर्ल्ड कप 2026 ची सुरुवात रंगतदार सामन्यानं झाली आहे. पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये झालेली पहिली मॅच शेवटच्या ओव्हर्संपर्यंत रंगली.
नेदरलँड्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 आऊट 147रन्स केले होते. 148 रन्सचा पाठलाग करताना पाकिस्तानची चांगलीच दमछाक झाली. अननुभवी नेदरलँड्सच्या बॉलर्सनी कागदावर कमाल असलेल्या पाकिस्तानी बॅटर्सच्या मर्यादा उघड केल्या. फहीम अश्रफनं 19 व्या ओव्हर्समध्ये फटकेबाजी केल्यानं पाकिस्तानला नामुश्की टाळता आली. पाकिस्ताननं 3 बॉल आणि 3 विकेट्सनं अखेर हा सामना जिंकला.
पाकिस्तानची दमछाक
नेदरलँड्सनं दिलेलं 148 रन्सचं आव्हान पाकिस्तान आरामात पार करेल असं वाटत होतं. पण, तसं झालं नाही. पाकिस्तानच्या ठाराविक अंतरानं विकेट्स पडल्या. गेल्या काही मॅचपासून स्वत:ला प्रमोट करत तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला सलमान आगा फक्त 12 रन काढून आऊट झाला.
( नक्की वाचा : T20 World Cup 2026: फक्त भारतासोबत खेळणार नाही! पाकिस्तानच्या 'निवडक बहिष्कारा'वर काय सांगतात ICC चे नियम? )
बाबर आझमनं T20 क्रिकेटमध्येही त्याचा संथ खेळ सुरु ठेवला. तो 18 बॉलमध्ये 15 रन काढून आऊट झाला. बाबरनंतर उस्मान खान (0) मोहम्मद नवाझ (6) आणि शादाब खान (8) हे तीन बॅटर झटपट आऊट झाल्यानं पाकिस्तानची टीम अडचणीत आली होती.
6 बॉलमध्ये फिरली मॅच!
पाकिस्तानला शेवटच्या दोन ओव्हर्समध्ये विजयासाठी 29 रन्स हवे होते. त्यावेळी फहीम अश्रमफनं 19 व्या ओव्हर्समध्ये 24 रन काढत पाकिस्तानचा विजय निश्चित केला. नेदरलँड्सकडून लोगन व्हॅन बीकनं ही ओव्हर टाकली. त्याच्या सहा बॉलमध्ये फहीम अश्रफनं 24 रन काढले. त्यामध्ये त्याला एक जीवदान मिळाले. फहीमनं या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोर लगावला. या सहा बॉलमध्येच नेदरलँड्सनं हा सामना गमावला.
( नक्की वाचा : Pakistan Cricket : पाकिस्तानचा 'गेम ओव्हर', भारताशी भिडण्याच्या नादात PCB जगात एकाकी, ICC चा महादणका तयार!)
त्यापूर्वी नेदरलँड्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 7 आऊट 143 रन्स केले. नेदरलँड्सकडून त्यांचा कॅप्टन स्कॉट एडवर्ड्सनं सर्वात जास्त 37 रन्स काढले.
T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये एकून 20 टीम सहभागी झाल्या आहेत. या टीमची विभागणी चार ग्रुपमध्ये करण्यात आलीय. प्रत्येक ग्रुपमध्ये 5 टीम आहेत. पाकिस्तानचा यजमान भारतासह ग्रुप A मध्ये समावेश करण्यात आलाय. A ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तानसह नेदरलँड्स, अमेरिका आणि नामिबिया या टीमचा समावेश आहे.