Pakistan vs Oman Saim Ayub Golden Duck PAK vs OMAN: आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. नवोदीत आणि दुबळ्या समजल्या जाणाऱ्या ओमानच्या बॉलर्सनी पाकिस्तानचा चांगलाच घाम काढला. पाकिस्तानचा माजी कॅप्टन बाबर आझमचा वारसदार म्हणून समजला जाणारा साईम अयूब पहिल्याच बॉलवर आऊट झाला. इतकंच नाही तर पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगालाही भोपळा फोडता आला नाही.
पाकिस्तानचा कॅप्टन सलमान आगानं या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण, दमदार सुरुवात करण्याचं पाकिस्तानचं स्वप्न हवेतच विरलं. साईम अयूब पहिल्याच बॉलवर आऊट झाला. शाह फैसलनं त्याला एलबीडब्ल्यू केलं.
अयूबचा फटका आणि त्याने घेतलेला रिव्ह्यू दोन्हीही अतिशय खराब होते आणि पाकिस्तानने सुरुवातीलाच एक विकेट तसेच एक रिव्ह्यू गमावला. अयूब फैसलच्या सरळ आणि फुल लेंथच्या चेंडूवर झुकला आणि लाइनच्या पलीकडे स्लॉग मारण्याचा प्रयत्न केला, पण तो पूर्णपणे चुकला आणि चेंडू त्याच्या मागच्या पॅडवर लागला. तो जवळपास झुकलेलाच होता आणि चेंडू थेट स्टंप्ससमोरच लागला. रिव्ह्यूमध्येही चेंडू कोणत्याही प्रकारे स्टंप्सच्या बाहेर जात नाहीय, असे दिसले. हा फटका एकदम सरळ होता, तरीही अयूबने ऑनफील्ड निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आणि टीमचा एक रिव्ह्यू गमावला.
( नक्की वाचा : Shahid Afridi : आशिया कपपूर्वी शाहिद आफ्रिदीची भारतावर आगपाखड; 'सडके अंडे' म्हणत दिग्गज खेळाडूला डिवचले )
बुमराहला 6 सिक्स मारण्याचं स्वप्न
सर्वात गमतीशीर बाब म्हणजे साईम अयूबच्या जोरावरच या स्पर्धेपूर्वी पाकिस्तानच्या गेल्या काही दिवसांपासून वल्गना सुरु होत्या. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी होणाऱ्या सामन्यात क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम बॉलर जसप्रीत बुमराहाला 6 सिक्स मारेल असा दावा पाकिस्तानचा डावखुरा फास्ट बॉलर तनवीर अहमदनं केला होता. पण, बुमराह सोडा अयूब ओमानच्या बॉलरविरुद्धच सपशेल फेल गेला.
सोशल मीडियावरही या विषयावर क्रिकेट फॅन्सनी अयूब आणि पाकिस्तानच्या टीमला चांगलंच ट्रोल केलंय.
दरम्यान पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 160 रन्स केले. पाकिस्तानकडून मोहम्मह हॅरिसनं सर्वात जास्त 66 रन्स केले. तर, ओमानकडून मोहम्मद नदीम आणि शाह फैसल यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.