Paralympics 2024 : शटलर नितेश कुमारनं जिंकलं गोल्ड मेडल, भारताला मिळालं 9 वं पदक

Paralympics Day 5 Live Updates: भारताचा पॅरा शटलर नितेश कुमारनं फायनल मॅचमध्ये ब्रिटनच्या डॅनियल बेथलचा पराभव करुन गोल्ड मेडल पटकावलं आहे

Advertisement
Read Time: 2 mins
P
मुंबई:

Paralympics Day 5 Live Updates: भारताचा पॅरा शटलर नितेश कुमारनं (Nitesh Kumar) फायनल मॅचमध्ये ब्रिटनच्या डॅनियल बेथलचा पराभव करुन गोल्ड मेडल पटकावलं आहे. नितेशनं 80 मिनिटं झालेल्या फायनलमध्ये 21-14, 18-21, 23-21 असा विजय मिळवला. पॅरिसमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचं हे नववं मेडल आहे. तर दुसरं गोल्ड मेडल आहे.

यापूर्वी सोमवारी झालेल्या सामन्यात पुरुषांच्या डिस्कस थ्रो एफ-56 गटामध्ये भारताच्या योगेश कथुनियानं सिल्व्हर मेडल पटकावलं. त्यानं सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत हे मेडल पटकावलं आहे. बॅडमिंटनपटू सुहास यतिराज, नितेश कुमार आणि तुलसीमथी मुरुगेसन देखील त्यांच्या गटात गोल्ड मेडलची मॅच खेळणार आहेत. 

( नक्की वाचा : Paralympics 2024 : कोण आहे भारताची गोल्डन गर्ल अवनी लेखरा? गंभीर अपघातानंतरही ढळली नाही जिद्द )

नेमबाज निहाल सिंह आणि आमिर भट पी3-मिश्र 25 मीटर पिस्टल एसएच1 पात्रता प्रिसिशनमध्ये खेळतील. तर शीतल देवी आणि राकेश कुमार हे तिरंदाज मिश्र कंपाऊंड ओपन क्वार्टर फायनलमध्ये भाग घेतील. सुमीत अंतिल पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत भाग घेणार आहेत. 

Advertisement

कोण आहे नितेश कुमार?

पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणारा नितेश कुमार हा दुसरा भारतीय आहे. यापूर्वी नेमबाज अवनी लेखरानं गोल्ड मेडल पटकावले होते. विशाखपट्टणममध्ये 2009 साली झालेल्या एका रेल्वे अपघातामध्ये नितेशनं त्याचा डावा पाय गमावला होता. या अपघातानंतर तो अनेक महिने अंथरुणाला खिळून होता.

नितेशनं या अपघातानंतरही जिद्द न गमावता त्यानं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलजी (IIT) च्या प्रवेश परीक्षेची तयारी केली. ही खडतर प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत त्यानं आयआयटी मंडीमध्ये 2013 साली प्रवेश मिळवला. आयआयटीमध्येच त्याला बॅडमिंटनची गोडी निर्माण झाली. 2016 साली त्यानं पॅरालिम्पिक गटातील राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकली होती. आयआयटी पदवीधर असलेला नितेश हरयाणा सरकारमधील क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयात वरिष्ठ मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article