Paris Olympic Games 2024 Day 3 LIVE: पॅरिस ऑलिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. मनू भाकर (Manu Bhaker) आणि सरबजोत सिंह (Sarabjot Singh) या जोडीनं 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र टीम स्पर्धेच्या ब्रॉन्झ मेडल मॅचसाठी क्वालिफाय केलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनू भाकर इतिहास रचणार?
मनू भाकरनं यापूर्वी रविवारी महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात ब्रॉन्झ मेडल जिंकलं. भारताकडून ऑलिम्पिक मेडल जिंकणारी ती पहिली महिला नेमबाज आहे. त्यापाठोपाठ मनू आणखी एका पदकाच्या जवळ आली आहे. मनू आणि सरबजोतचा दक्षिण कोरियाच्या जोडीशी मंगळवारी सामना होणार आहे. या सामन्यात भारतीय जोडी विजयी झाली तर एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल जिंकणारी मनू भाकर ही पहिली भारतीय ठरणार आहे.
10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेच्या पात्रता फेरीत मनू भाकर-सरबजोत जोडीनं 580 पॉईंट्स मिळवले. ही जोडी पात्रता फेरीत तिसऱ्या क्रमांकावर राहिली. या गटात रिदम संगवान आणि अर्जुन सिंह चिमा ही भारतीय जोडी देखील सहभागी झाली होती. त्यांना फायनल गाठण्यास अपयश आलं. ही जोडी 10 व्या क्रमांकावर राहिली.
रमिताला पदकाची हुलकावणी
भारताला सोमवारी रमिता जिंदलकडून पदकाची अपेक्षा होती. पण, रमिताला पदक मिळवण्यात अपयश आलं. 10 मीटर एअर रायफल स्पर्धेच्या फायनलमध्ये रमिताला सातवा क्रमांक मिळाला. पहिल्या एलिमेनेशननंतर रमिता सहाव्या क्रमांकावर होती. त्यानंतर तिनं 10.4 आणि 10.5 पॉईंट्सचे दोन शॉट्स लगावले. त्यानंतर तिचा एकूण स्कोअर 145.3 झाला. फ्रान्सच्या मुलरचाही 145.3 स्कोअर होता. त्यानंतर शूटआऊट झाले. त्या शूट आऊटमध्ये रमितानं 10.2, 10.2 चे शॉट्स लगावले. तर मुलरनं 10.6 आणि 10.1 चा शॉट लगावला. त्यामुळे रमिताचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं.