Manu Bhakar : मनू भाकरनं खेल रत्न प्रकरणात मौन सोडलं, भावुक पोस्टमधून मांडलं मत

Manu Bhaker's Big Reaction on Khel Ratna Controversy : खेल रत्न पुरस्कारांसाठी नामंकन मिळवणाऱ्यांच्या यादीत मनूचं नाव नसल्याचं वृत्त  माध्यमांनी दिलं. त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Manu Bhaker's Big Reaction on Khel Ratna Controversy : पॅरिसमध्ये यावर्षी झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजपटू मनू भाकरनं इतिहास रचला. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन मेडल मिळवणारी मनू पहिली भारतीय ठरली. आता 2024 वर्ष संपत असताना मनू भाकर वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. खेल रत्न पुरस्कारांसाठी नामंकन मिळवणाऱ्यांच्या यादीत मनूचं नाव नसल्याचं वृत्त  माध्यमांनी दिलं. त्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली. मनू भाकरच्या वडिलांनी याबाबत मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर स्वत: मनूनं याबाबत मौन सोडलं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाली मनू ?

मनू भाकरनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून या विषयावरील मत व्यक्त केलंय. 'माझं पहिलं लक्ष हे देशासाठी पद जिंकणं आहे, कोणताही पुरस्कार मिळवणं नाही,' असं मनूनं जाहीर केलंय. पुरस्कार माझ्यासाठी प्रेरणा ठरु शकतात पण ते आपलं लक्ष्य नसल्याचं मनूनं म्हंटलं आहे.

मनू भाकरनं पोस्टमध्ये लिहलंय, 'माझ्या खेलरत्न पुरस्काराच्या नामांकनाबाबत खूप चर्चा होत आहे. त्यावर मला सांगायचं आहे की, एक खेळाडू म्हणून माझं लक्ष्य खेळणं आणि देशासाठी प्रदर्शन करणे आहे. पुरस्कार किंवा कोणताही सन्मान मला प्रोत्साहन देतात. पण, ते माझं लक्ष्य नाही.'


( नक्की वाचा : Year Ender 2024 : T20 वर्ल्ड कप विजेतेपद ते अश्विनची रिटायरमेंट, कसं गेलं भारतीय क्रिकेटसाठी वर्ष? )

मनू पुढं म्हणाली, 'मला वाटतंय माझ्या नामांकनाच्या वेळी माझ्याकडून काही तरी चूक झाली होती. ती चूक आता सुधारण्यात आली आहे. पुरस्कार मिळो किंवा न मिळो, मी देशासाठी देशासाठी जास्तीत जास्त मेडल मिळवण्याचा प्रयत्न करत राहीन. माझी सर्वांना विनंती आहे की, या प्रकरणात आता कुणी काही बोलू नये.'

Advertisement

खेलरत्न बाबत अद्याप निर्णय नाही

दरम्यान, खेलरत्न पुरस्कारासाठीची अंतिम यादी अद्याप निश्चित झाली नसल्याची माहिती क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया याबाबत एक-दोन दिवसांमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. अंतिम यादीमध्ये मनू भाकरचा समावेश असण्याची दाट शक्यता आहे.

उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखालील 12 सदस्यीय समितीमध्ये भारतीय महिला हॉकी टीमची माजी कॅप्टन राणी रामपालसह माजी खेळाडूंचा समावेश आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article