Who Is Rashid Khan's Second Wife? : अफगाणिस्तानचा सुपरस्टार क्रिकेटपटू आणि जगभर T20 लीग्समध्ये आपल्या फिरकी गोलंदाजीने बॅटरला घाम फोडणारा स्टार राशिद खान (Rashid Khan) सध्या क्रिकेटपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अधिक चर्चेत आहे. नेदरलँड्समध्ये आयोजित 'राशिद खान चॅरिटी फाउंडेशन'च्या एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेसोबतचे त्याचे फोटो व्हायरल झाले आणि त्याने लगेचच ती त्याची पत्नी असल्याचे जाहीर केले. पण, त्याने ऑगस्ट 2025 मध्ये दुसऱ्यांदा निकाह (विवाह) केल्याचे सांगितल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
राशिद खानची स्पष्ट कबुली
काही दिवसांपूर्वी 'राशिद खान चॅरिटी फाउंडेशन'च्या उद्घाटन सोहळ्यात राशिद खान एका अफगाणी पोषाखातील महिलेसोबत दिसला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर राशिदच्या दुसऱ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. अफवांना पूर्णविराम देत राशिदने स्वतः इन्स्टाग्रामवर पोस्ट करून यावर खुलासा केला. त्याने सांगितले की, फोटोमध्ये असलेली महिला त्याची पत्नी आहे आणि त्यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी निकाह केला आहे.
( नक्की वाचा : IPL Trade News : मुंबई इंडियन्सचं सिक्रेट डील ! बड्या खेळाडूला टीममध्ये घेतलं? रोहित शर्माचा आहे खास मित्र )
त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, " 2 ऑगस्ट 2025 रोजी मी माझ्या आयुष्यातील एका नव्या आणि अर्थपूर्ण अध्यायाला सुरुवात केली. माझा निकाह झाला आणि एका अशा स्त्रीशी माझं लग्न झालं, जी प्रेम, शांती आणि भागीदारीचे प्रतीक आहे, ज्याची मला नेहमीच अपेक्षा होती.
लपवण्यासारखं काही नाही
चॅरिटी कार्यक्रमातील फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक चुकीचे तर्क लावत असल्याबद्दल त्याने खंत व्यक्त केली. "मी नुकतंच माझ्या पत्नीला एका चॅरिटी इव्हेंटमध्ये घेऊन गेलो आणि एवढ्या साध्या गोष्टीवरून लोकांनी चुकीचे अंदाज बांधले, हे दुर्दैवी आहे. सत्य अगदी स्पष्ट आहे, ती माझी पत्नी आहे आणि आम्ही एकत्र आहोत, आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही," असे राशिदने स्पष्ट केले.
( नक्की वाचा : कर्जमुक्तीचा महामंत्र! 6 वर्षांत 53 लाखांचे Home Loan फेडणाऱ्या इंजिनियरने सांगितल्या 'या' 6 खास टिप्स )
राशिदने पहिल्यांदा ऑक्टोबर 2024 मध्ये त्याच्या चुलत बहिणीशी लग्न केले होते. विशेष म्हणजे, त्याच दिवशी काबुलमध्ये एका भव्य समारंभात राशिदचे तीन भाऊ (आमिर खलील, जकीउल्लाह आणि रजा खान) यांचाही निकाह झाला होता.