Ashwin : कदाचित अश्विनचा अपमान झाला असेल... वडिलांचा धक्कादायक दावा! क्रिकेटपटूनं दिलं स्पष्टीकरण

R. Ashwin Retirement : महान क्रिकेटपटू आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर सुरु झालेल्या वादाला वेगळं वळण मिळालं आहे. आ

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

R. Ashwin Retirement : महान क्रिकेटपटू आर. अश्विनच्या निवृत्तीनंतर सुरु झालेल्या वादाला वेगळं वळण मिळालं आहे. आर. अश्विननं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील ब्रिस्बेन टेस्ट संपल्यानंतर निवृत्ती जाहीर केली. अश्विनच्या या निर्णयाची कल्पना टीममधील अनेक सहकाऱ्यांनाही नव्हती. अश्विननं घाई-घाईनं निवृत्ती का घेतली? हा प्रश्न आता विचारला जात आहे. माझी गरज नसेल तर मी खेळ थांबवतो, हे अश्विननं खेळणं थांबवतो, अशी कल्पना अश्विननं ऑस्ट्रेलिया सीरिजपूर्वीच दिली होती, अशी माहिती आता प्रसिद्ध झालीय. या सर्व घडामोडींमध्ये अश्विनच्या वडिलांचं वक्तव्य आणि त्यावर अश्विननं स्वत: केलेला खुलासा यामुळे हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं बनलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले अश्विनचे वडील?

अश्विननं अचानक निवृत्ती जाहीर केल्यानं क्रिकेट फॅन्स प्रमाणेच त्याच्या आई-वडिलांनाही धक्का बसलाय. अश्विनचे वडील रविचंद्रन यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये तसं कबुल केलंय. 'मलाही याबाबत अगदी शेवटच्या क्षणी समजलं. अश्विनच्या मनात काय सुरु होतं, हे मला माहिती नाही. त्यानं एकदम घोषणा केली. मी आनंदानं त्याचा निर्णय मान्य केला.' 

त्यांनी पुढे सांगितलं, 'मला त्याच्या निवृत्तीबाबत कोणतीही कल्पना नव्हती. त्यानं निवृत्ती घेतल्यानं एकीकडे मी आनंदी होतं तर त्याचवेळी दुसरीकडे त्यानं आणखी खेळायला हवं होतं, अशी माझी इच्छा होती.'

( नक्की वाचा : 'BCCI शी चर्चा झालीच नव्हती,' 'या' खेळाडूच्या निवडीमुळे अश्विननं केली निवृत्तीची घाई? )

.... त्याचा अपमान झाला असेल

अश्विनच्या वडिलांनी पुढं सांगितलं की, 'खेळ थांबवण्याचा निर्णय त्याचा आहे. मी त्याच्यामध्ये हस्तक्षेप करु शकत नाही. पण, त्यानं ज्या पद्धतीनं निवृत्ती जाहीर केली त्याची अनेक कारणं असू शकतात. याबाबत फक्त अश्विनलाच माहिती आहे. कदाचित त्याचा अपमानही झाला असेल, अशी भावुक प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Advertisement

'तो गेल्या 14-15 वर्षांपासून मैदानात होता. आता अचानक परिस्थिती बदलली. त्याच्या निर्णयानं आम्हाला धक्काच बसला. शेवटी त्याला हे किती दिवस परवडणार? बहुधा त्यानं स्वत:च निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असावा,' असं त्यांनी सांगितलं.

( नक्की वाचा : 'माझी गरज नसेल तर...' आर. अश्विनचं निवृत्तीपूर्वी रोहितशी झालेलं संभाषण उघड )

अश्विनचं स्पष्टीकरण

वडिलांच स्पष्टीकरण व्हायरल झाल्यानंतर अश्विननं या विषयावर तातडीनं स्पष्टीकरण दिलं आहे.  'माझ्या वडिलांना मीडिया ट्रेनिंग मिळालेलं नाही. डे फादर अण्णा दा इथलंम (साोडा ना... हे साधारण भाषांतर). तुम्ही वडिलांच्या बोलण्याची समृद्ध परंपरेचं तुम्ही पालन करत असाल असं मला वाटलं नव्हतं. कृपया त्यांना क्षमा करा, आणि त्यांना एकटं सोडा,' असं आवाहन अश्विननं केलं आहे.

अश्विननं ब्रिस्बेन टेस्ट संपल्यानंतर बुधवारी (18 डिसेंबर) निवृत्ती घेतली. तो टेस्ट क्रिकेटमध्ये अनिल कुंबळेनंतर भारताचा दुसरा यशस्वी बॉलर आहे. त्यानं 106 टेस्टमध्ये 537 विकेट्स घेतल्या आहेत. 

Advertisement