Ashwin: घरच्या मैदनावर अश्विननं घडवला इतिहास, 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू

R. Ashwin creates history : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं इतिहास घडवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ravichandran Ashwin
मुंबई:

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील चेन्नई टेस्टमध्ये आर. अश्विननं (R. Ashwin) इतिहास घडवला आहे. अश्विननं आजवर अनेकदा त्याच्या ऑफ स्पिन बॉलिंगच्या जोरावर टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. घरच्या मैदानावर भारतीय क्रिकेट टीमचा दबदबा करण्यात अश्विनचा मोठा वाटा आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये भारतानं मायदेशात एकही टेस्ट सीरिज गमावलेली नाही. त्यामध्ये अश्विनचं महत्त्वाचं योगदान आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कठिण परिस्थितीमध्ये सावरलं

फक्त बॉलिंगच नाही तर बॅटिंगमध्येही टीमला संकटातून बाहेर काढण्याचं काम अश्विननं अनेकदा केलंय. दोन दिवसांपूर्वीच (17 सप्टेंबर) 37 वा वाढदिवस साजरा करणाऱ्या अश्विननं गुरुवारीही तेच केलं. चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवशी अश्विन बॅटिंगला उतरला, त्यावेळी टीम इंडियाची अवस्था 6 आऊट 144 होती. 

विराट कोहली, रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल हे सर्व प्रमुख बॅटर आऊट झाले होते. बांगलादेशचे बॉलर फॉर्मात होते. टीम इंडिया 200 रनचा टप्पा तरी पार करणार का? हा प्रश्न स सर्वांना सतावत होता. त्यावेळी अश्विननं ऑल राऊंडर रविंद्र जडेजाच्या मदतीनं टीम इंडियाची इनिंग सावरली.

अश्विनचा रेकॉर्ड

अश्विननं चेन्नईच्या मैदानात कशी बॅटिंग करायची याचं प्रात्याक्षिक दाखवलं. त्यानं सुरुवातीपासून बांगलादेशच्या बॉलर्सवर वर्चस्व गाजवलं. त्यानं 58 बॉलमध्येच 6 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. अश्विनची टेस्ट क्रिकेटमधील ही पंधरावी हाफ सेंच्युरी आहे. या हाफ सेंच्युरीसह अश्विननं टेस्ट क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला.

Advertisement

( नक्की वाचा : IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video )

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात 500 विकेट्स आणि 20 वेळा 50 रनचा टप्पा ओलांडणारा अश्विन हा एकमेव क्रिकेटपटू बनलाय. जगातील कोणत्याही ऑल राऊंडरला ही कामगिरी यापूर्वी करता आलेली नाही. 

Advertisement

अश्विनची दमदार सेंच्युरी

अश्विनच्या बॅटीमधून रन्सचा ओघ हा पन्नाशीनंतरही सुरु होता. त्यानं पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सेशनमध्ये बांगलादेशच्या बॉलरवर वर्चस्व गाजवलं. अश्विननं 108 बॉलमध्ये टेस्ट कारकिर्दीमधील 6 वी सेंच्युरी पूर्ण केली. या खेळीत त्यानं 10 फोर आणि 2 सिक्स लगावले. 

पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा टीम इंडियानं 6 आऊट 339 रन केले होते. अश्विन 102 तर जडेजा 86 रनवर नाबाद होते. या दोघांनी सातव्या विकेटसाठी आत्तापर्यंत 195 रनची पार्टनरशिप केली आहे. 
 

Advertisement
Topics mentioned in this article