Ravichandran Ashwin : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2026 च्या हंगामासाठी फ्रँचायझींना त्यांची रणनीती ठरवण्यासाठी काही महिने बाकी आहेत. पण, त्यापूर्वी संभाव्य खेळाडूंची अदलाबदल आणि बाहेर पडण्याच्या अफवा सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन (Sanju Samson) टीम सोडणार असल्याची क्रिकेटच्या वर्तुळात सुरू आहे. संजू पुढील सिझनपूर्वी चेन्नई सुपर किंग्समध्ये जाणार असल्याचं मानलं जात आहे. त्याचवेळी सीएसकेच्या फॅन्ससाठी एक धक्कादायक बातमी आहे.
एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, गेल्या वर्षी CSK मध्ये परतलेल्या रविचंद्रन अश्विनने फ्रँचायझी व्यवस्थापनाला त्याला मुक्त करण्यास सांगितले आहे.
गेल्या वर्षी अश्विनचे चेन्नई फ्रँचायझीमध्ये पुनरागमन खूप चर्चेत होते, कारण याच फ्रँचायझीमधून या ऑफ-स्पिनरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. पण अश्विनचे हे पुनरागमन फक्त एका वर्षासाठीच टिकेल असे दिसते, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या या अनुभवी स्पिनरला आता नवीन आव्हान हवे आहे.
कसा होता अश्विनचा सिझन?
अश्विनसाठी IPL 2025 चा हंगाम फारसा यशस्वी ठरला नाही. त्याने CSK साठी फक्त 9 सामने खेळले आणि त्यात 7 विकेट्स घेतल्या. या निराशाजनक हंगामात अश्विनला अनेक सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागले, कारण फ्रँचायझीने युवा पर्यायांना संधी दिली
संजू सॅमसन राजस्थान रॉयल्समधून बाहेर पडणार असल्याच्या अफवा खऱ्या असतील, तर तो CSK साठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विकेट किपर-बॅटर आणि कॅप्टन म्हणून, सॅमसन कदाचित 2026 च्या हंगामापूर्वी एमएस धोनीची जागा घेण्यासाठी सर्वात योग्य उमेदवार आहे.
( नक्की वाचा : IPL 2026 : 'या' 2 खेळाडूंच्या बदल्यात सीएसकेकडून खेळणार संजू सॅमसन! दोन्ही फ्रँचायझीमध्ये चर्चा सुरु )
विशेष म्हणजे, अश्विन यापूर्वी राजस्थान रॉयल्सकडून खेळला होता. त्यामुळे, अश्विन आणि सॅमसन यांच्यातील अदलाबदल (trade) हा RR आणि CSK या दोन्ही संघांसाठी एक संभाव्य उपाय असू शकतो.