Rinku Singh Priya Saroj : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंह सध्या त्याच्या लव्हस्टोरीसाठी चर्चेत आहेत. समाजवादी पार्टीच्या खासदार प्रिया सरोज यांच्यासोबत झाला आहे. क्रिकेटपटू रिंकू आणि राजकारणात सक्रीय असलेल्या प्रिया सरोज यांचं प्रेम कधी जुळलं? त्यांच्यात बोलणी कधी सुरु झाली? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. रिंकूनं एका मुलाखतीमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीचा टर्निंग पॉईंट सांगितला आहे.
रिंकू सिंहनं इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 मधील गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) या मॅचमधील शेवटच्या ओव्हरमध्ये सलग पाच सिक्स लगावले होते. त्याच्या या अफाट कामगिरीमुळे केकेआरला अशक्य वाटणारा विजय मिळला. या मॅचनंतर रिंकू सिंह एकदम सर्वत्र चर्चेत आला. आक्रमक बॅटर म्हणून त्याचा लौकिक वाढला. त्याला टीम इंडियात संधी मिळाली. या मॅचनं रिंकूच्या फक्त क्रिकेट कारकिर्दीचं चित्र बदललं नाही. तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही एक महत्त्वपूर्ण टर्निंग पॉईंट आला.
रिंकूनं यूट्यबर राज शमनी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये या घटनेचा खुलासा केला आहे. त्याने सांगितले की, त्या मॅचने त्याच्या आणि त्याची होणारी पत्नी प्रिया सरोज आणि रिंकूच्या नात्याला एक वेगळीच दिशा दिली.
( नक्की वाचा : Asia Cup 2025: रोहित शर्माला मोठा धक्का! हाँगकाँगच्या 'बाबर'ने रचला इतिहास )
‘ती रडायला लागली...'
रिंकूनं दिलेल्या माहितीनुसार, त्या अविश्वसनीय विजयानंतर त्याची भावी बायको प्रिया सरोज खूप भावूक झाली होती. तो म्हणाला, “नितीश राणाच्या पत्नी साची दीदीने मला सांगितले की ती (प्रिया) रडत होती. तेव्हा मला वाटले की आता कदाचित गोष्टी सोप्या होतील. लग्नाचा मार्गही मोकळा होऊ शकतो.”
या घटनेच्या वेळी प्रिया राजकारणात सक्रिय नव्हती आणि तिच्या वडिलांना क्रिकेटमध्ये फारशी आवड नव्हती. त्यामुळे रिंकू सिंह कोण आहे, हे त्यांना फारसे माहित नव्हते. पण त्या पाच सिक्सर्सनंतर सर्व काही बदलले.