Rohit Sharma : टीम इंडियाचा टेस्ट आणि वन-डे कॅप्टन रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. त्याची पत्नी रितीकानं शुक्रवारी रात्री (15 नोव्हेंबर) मुलाला जन्म दिला. हे वृत्त सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. दक्षिण आफ्रिकेत असलेल्या भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंनी देखील रोहित आणि रितिकाला व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या. पण, रोहित किंवा रितिका यांनी त्यावर कोणती प्रतिक्रिया दिली नव्हती. आता अखेर रोहितनं इस्टाग्रामवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे.
रोहितनं शेअर केला खास फोटो
रोहित शर्मानं त्याच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर एक पोस्ट शेअर केलीय. त्यामध्ये त्यानं एक फोटो अपलोड केला असून त्यामध्ये सोफ्यावर पती-पत्नी आणि दोन लहान मुलं असं चार जणांचं कुटुंब बसलं आहे. त्यानं या फोटोला FAMILY, the one where are FOUR असं कॅप्शन दिलं आहे.
रोहित आणि रितीका यांनी 13 डिसेंबर 2015 रोजी लग्न केलं. त्यांना 30 डिसेंबर 2018 रोजी पहिली मुलगी झाली. समायरा असं तिचं नाव आहे. समायरा आता पाच वर्षांची झाली आहे. त्यानंतर रोहितच्या घरी दुसऱ्या बाळाचं आगमन झालं आहे. लग्नापूर्वी रोहित आणि रितिका यांनी बराच काळ एकमेकांना डेट केलं होतं. लग्नानंतरही त्यांच्यातील बॉन्ड मैदानात दिसला आहे. रितिकानं अनेकदा प्रेक्षकांच्या गॅलरीतून रोहितला प्रोत्साहन दिलं आहे.
( नक्की वाचा : IND vs SA : तिलक वर्माचा खेळ पाहून कॅप्टन सूर्याच्या डोळ्यात पाणी, Video )
रितिका दुसऱ्यांदा गर्भवती असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून होती. पण, रोहित शर्मानं त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला दाखल झाली आहे. पण, रोहितनं या दौऱ्यातील सुरुवातीच्या टप्प्यात वैयक्तिक कारणानं माघार घेतली आहे.