Rohit Sharma : रोहितसाठी 2025 हे वर्ष जबरदस्त ठरलं.
मुंबई:
Rohit Sharma Records 2025 : टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्माने मैदानात रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे. 2025 हे वर्ष त्याच्यासाठी अत्यंत खास ठरलं असून त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल 62 मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. या वर्षात रोहितने 14 वनडे मॅच खेळताना 50 च्या सरासरीने 650 रन केले. यामध्ये त्याने 2 सेंच्युरी आणि 4 हाफ सेंच्युरी झळकावली आहेत. विशेष म्हणजे 100.46 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत त्याने 'हिटमॅन' ही आपली ओळख सार्थ ठरवली आहे.
2007 पासून 2025 पर्यंतच्या प्रदीर्घ प्रवासात त्याने 279 वनडे मॅचमध्ये 33 सेंच्युरींच्या मदतीने 11516 रन केले आहेत. गेल्या तीन वर्षांचा विचार केला तर 2023 ते 2025 दरम्यान रोहितने 44 मॅचमध्ये 51.55 च्या सरासरीने 2062 रन केले आहेत. वर्षाच्या अखेरीस तो ICC रँकिंगमध्ये नंबर 1 चा बॅटर बनलाय.
रोहित शर्माने 2025 पर्यंत केलेले ते 62 महारेकॉर्ड्स कोणते ते पाहूया
- वनडेमध्ये सर्वाधिक 355 सिक्स मारणारा बॅटर
- ओपनर म्हणून भारतासाठी सर्वाधिक 15,933 रन
- ओपनर म्हणून भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक 45 सेंच्युरी
- भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक 4 ICC ट्रॉफी जिंकणारा खेळाडू
- ICC टूर्नामेंटमध्ये कॅप्टन म्हणून संयुक्तपणे सर्वाधिक 4 M.O.M अवॉर्ड्स
- ICC वनडेमध्ये कॅप्टन म्हणून सर्वाधिक 93.8% विजयाची टक्केवारी
- ICC वनडेमध्ये सर्वाधिक 68 सिक्स मारणारा बॅटर
- कॅप्टन म्हणून भारतासाठी संयुक्तपणे सर्वाधिक 126 वनडे सिक्स
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयुक्तपणे सर्वाधिक 9 वनडे सेंच्युरी
- वनडेमध्ये M.O.S जिंकणारा सर्वात वयस्कर भारतीय (38 वर्ष)
- वनडेमध्ये M.O.M जिंकणारा सर्वात वयस्कर भारतीय (38 वर्ष)
- SENA देशांमध्ये सर्वाधिक 14 वनडे सेंच्युरी
- ऑस्ट्रेलियात पाहुणा बॅटर म्हणून सर्वाधिक 6 वनडे सेंच्युरी
- ऑस्ट्रेलियात कोणत्याही भारतीयाकडून सर्वाधिक 1,530 वनडे रन
- परदेशात वनडे सेंच्युरी करणारा सर्वात वयस्कर भारतीय
- ऑस्ट्रेलियात वनडे सेंच्युरी ठोकणारा सर्वात वयस्कर भारतीय
- आशियाई ओपनर म्हणून 9,000 वनडे रन पूर्ण करणारा सर्वात वेगवान खेळाडू
- 11,000 वनडे रन पूर्ण करणारा जगातील दुसरा सर्वात वेगवान खेळाडू
- चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये M.O.M जिंकणारा एकमेव कॅप्टन
- चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा सर्वात वयस्कर कॅप्टन (37 वर्ष 313 दिवस)
- चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा सर्वात वयस्कर भारतीय (37 वर्ष 313 दिवस)
- वनडेमध्ये रनचा पाठलाग करताना ओपनर म्हणून सर्वाधिक 178 सिक्स
- इंटरनॅशनल मॅचेसमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संयुक्तपणे सर्वाधिक 64 सिक्स
- दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय ओपनर म्हणून सर्वाधिक 1,766 रन
- भारतात 5,000 वनडे रन पूर्ण करणारा तिसरा भारतीय खेळाडू
- ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 वनडे M.O.S जिंकणारा एकमेव खेळाडू
- ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1,000 वनडे रन पूर्ण करणारा पहिला भारतीय
- वयाची 35 वर्ष पूर्ण झाल्यावर भारतासाठी सर्वाधिक 9 M.O.M अवॉर्ड्स
- रनचा पाठलाग करताना संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक 17 वनडे शतकं
- SENA देशांमध्ये 150 सिक्स पूर्ण करणारा पहिला आशियाई खेळाडू
- SENA देशांमधील वनडे मॅचेसमध्ये पाहुणा बॅटर म्हणून सर्वाधिक 95 सिक्स
- 50 इंटरनॅशनल शतकं पूर्ण करणारा तिसरा भारतीय बॅटर
- विजय मिळालेल्या मॅचेसमध्ये 8,000 वनडे रन पूर्ण करणारा तिसरा भारतीय
- 20,000 इंटरनॅशनल रन पूर्ण करणारा चौथा भारतीय
- भारतासाठी तिसरे सर्वाधिक वनडे रन करणारा बॅटर
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय ओपनर म्हणून सर्वाधिक 10 इंटरनॅशनल सेंच्युरी
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय ओपनर म्हणून सर्वाधिक 23 वेळा 50+ स्कोअर
- वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संयुक्तपणे सर्वाधिक 3 M.O.S अवॉर्ड्स
- वनडे फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध M.O.S जिंकणारा सर्वात वयस्कर खेळाडू
- संयुक्तपणे सर्वाधिक 9 ICC फायनल खेळणारा खेळाडू
- ICC वनडेमध्ये रनचा पाठलाग करताना भारतासाठी सर्वाधिक 7 वेळा टॉप स्कोअरर
- ICC नॉकआउट मॅचेसमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक 3 M.O.M अवॉर्ड्स
- ICC टूर्नामेंट्समध्ये दुसरे सर्वाधिक 12 M.O.M अवॉर्ड्स
- चॅम्पियन्स ट्रॉफी नॉकआउटमध्ये 2 M.O.M जिंकणारा एकमेव भारतीय
- ICC फायनलमध्ये 50+ रन करणारा तिसरा भारतीय कॅप्टन
- ICC फायनलमध्ये 50+ रन करणारा सर्वात वयस्कर भारतीय
- 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये M.O.M जिंकणारा एकमेव कॅप्टन
- कॅप्टन म्हणून 100 मॅच जिंकणारा दुसरा सर्वात वेगवान खेळाडू
- ICC मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 4 विजय मिळवणारा एकमेव भारतीय कॅप्टन
- विजय मिळालेल्या मॅचेसमध्ये 12,000 रन करणारा पहिला आशियाई ओपनर
- SENA टीम्सविरुद्ध 5,000 वनडे रन पूर्ण करणारा दुसरा आशियाई ओपनर
- वयाची 36 वर्ष पूर्ण झाल्यावर एकापेक्षा जास्त ICC ट्रॉफी जिंकणारा एकमेव कॅप्टन
- ICC टूर्नामेंटमध्ये M.O.M जिंकणारा सर्वात वयस्कर कॅप्टन (37 वर्ष 313 दिवस)
- ICC मॅचेसमध्ये भारतीय कॅप्टन म्हणून सलग सर्वाधिक 13 विजय
- एकही मॅच न हारता सलग ICC ट्रॉफी जिंकणारा पहिला आशियाई आणि दुसरा कॅप्टन
- पूर्ण टूर्नामेंटमध्ये एकही टॉस न जिंकता ICC ट्रॉफी जिंकणारा पहिला कॅप्टन
- ICC टूर्नामेंटच्या QF, SF आणि फायनलमध्ये M.O.M जिंकणारा पहिला भारतीय
- तिन्ही ICC लिमिटेड ओव्हर टूर्नामेंट (WC, T20WC, CT) मध्ये M.O.M जिंकणारा एकमेव कॅप्टन
- ICC टूर्नामेंटमध्ये सर्व SENA टीम्सविरुद्ध M.O.M जिंकणारा जगातील एकमेव खेळाडू
- सर्व 4 ICC इव्हेंट्सच्या फायनलमध्ये कॅप्टन्सी करणारा एकमेव कॅप्टन
- ICC वनडे इव्हेंट्सच्या QF, SF आणि फायनलमध्ये टीमसाठी टॉप स्कोअर करणारा एकमेव भारतीय
- सर्व SENA टीम्सविरुद्ध ICC नॉकआउट मॅच जिंकणारा एकमेव कॅप्टन