Rohit Sharma Stops Fans From Chanting 'Mumbai Cha Raja, Rohit Sharma: टीम इंडियाच्या वन-डे टीमचा कॅप्टन रोहित शर्माचे संपूर्ण देशभर फॅन्स आहेत. रोहित मुंबईकर असल्यानं त्याची मुंबईमध्ये लोकप्रियता मोठी आहे. तो जिथं जाईल तिथं त्याला पाहण्यासाठी फॅन्सची गर्दी होत असते. रोहितला पाहातच फॅन्स त्याच्या नावाचा जयघोष करतात. पण, रोहित शर्मानं नुकतंच गणपती मंडपात जे केलं ते पाहून तुमच्या नात त्याच्याबद्दलचा आदर आणखी वाढणार आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये 'हिटमॅन' रोहित शर्मा पूजा करताना दिसत आहेत. याचवेळी त्यांच्या काही फॅन्सनी 'मुंबईचा राजा कोण?' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. यावर काही फॅन्सनी रोहितचे नाव घेतले, पण रोहित शर्माला ही गोष्ट आवडली नाही. त्याने वर मान करून हात जोडून त्यांना इशाऱ्यानेच थांबवले आणि शांत राहण्याची विनंती केली.
रोहित शर्मा फिटनेस टेस्टमध्ये पास
भारतीय खेळाडूंची काही दिवसांपूर्वी फिटनेस टेस्ट घेण्यात आली. त्यामध्ये रोहित शर्मानं सर्वांनाच चकीत केलं. रोहितनं सुट्ट्यांमध्ये त्याच्या फिटनेसवर बरीच मेहनत घेतली आहे. याच कारणामुळे मैदानावर जरा स्थूल दिसणारा 'हिटमॅन' शर्मा टेस्टच्या वेळी एकदम फिट दिसला. त्यानं आरामात ही टेस्ट पास केली.
( नक्की वाचा : Rohit Sharma : 'हिटमॅन' आता सुपरफिट! 95 किलोवरून 75 किलोवर कसा आला? जाणून घ्या रोहित शर्माचा डाएट )
रोहित शर्माने टेस्ट आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण एकदिवसीय (ODI) फॉर्मेटमध्ये तो अजूनही सक्रिय आहे. 'हिटमॅन' शर्माने सर्वात आधी टीम इंडियाला 2024 मध्ये टी20 विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिल्यानंतर टी20 फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर नुकतेच इंग्लंड दौऱ्याआधी त्यांनी 'रेड बॉल' क्रिकेटलाही अलविदा म्हटले. त्यामुळे आता तो फक्त वन-डे क्रिकेटमध्ये सक्रीय आहे.