Vaibhav Suryavanshi Becomes Youngest Player In IPL History इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा हा 18 वा सिझन आहे. आयपीएल ही जगातील सर्वात महागडी आणि टफ T20 क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये खेळण्याची जगभरातील क्रिकेटपटूंची इच्छा असते. पण, ऑक्शनमध्ये खरेदी न केल्यानं अनेकांचं ते स्वप्न पूर्ण होत नाही. आयपीएल स्पर्धेच्या 18 वर्षांच्या इतिहासात 19 एप्रिल 2025 हा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. या दिवशी वैभव सूर्यवंशी या 14 वर्षांच्या खेळाडूनं राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) आयपीएलमध्ये पदार्पण केलंय. आयपीएलमध्ये पदार्पण करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन दुखापतीमुळे लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा (Lucknow Super Giants) सामना खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये वैभव सूर्यवंशीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संधी देण्याचा निर्णय राजस्थानच्या मॅनेजमेंटनं घेतला. त्यामुळे वैभवला पदार्पणाची संधी मिळाली.
वैभवनं 14 वर्ष 23 दिवस पूर्ण केल्यानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं. त्याला 1.1 कोटीमध्ये राजस्थान रॉयल्सनं खरेदी केलं होतं. यापूर्वी हा रेकॉर्ड प्रयास रे बर्मन (Prayas Ray Barman) या खेळाडूच्या नावावर होता. त्यानं सनरायझर्स हैदराबादकडून आयपील 2019 मध्ये वयाच्या 16 व्या वर्षी पदार्पण केले होते.
( नक्की वाचा : गौतम गंभीरच्या सहमतीनं झाली अभिषेक नायरची हकालपट्टी! BCCI च्या कारवाईची Inside Story )
वैभवची खणखणीत सुरुवात
वैभवनं यशस्वी जैस्वालसह राजस्थानच्या इनिंगची सुरुवात केली. लखनौनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 180 रन्स केले होते. वैभवनं ओपनिंला बॅटिंगला उतरल्यावर खणखणीत सुरुवात केली. त्यानं आयपीएल कारकिर्दीमधील पहिल्याच बॉलवर सिक्सर लगावला. टीम इंडियाकडून खेळण्याचा अनुभव असलेला फास्ट बॉलर आवेश खानला त्यानं पहिल्याच ओव्हरमध्ये सिक्स लगावला.
वैभव 20 बॉलमध्ये 34 रन्स काढून आऊट झाला. या खेळीत त्यानं 2 फोर आणि 3 सिक्स लगावले. त्याचबरोबर यशस्वी जैस्वालबरोबर पहिल्या विकेटसाठी 85 रन्सची भागिदारी करत राजस्थानला दमदार सुरुवात करुन दिली.
कोण आहे वैभव?
वैभव बिहारमधील समस्तीपूरचा आहे. वयाच्या पाचव्या वर्षांपासून क्रिकेट खेळण्यास सुरु केलेल्या वैभवनं कूचबिबहार ट्रॉफी, विनू मंकड करंडक या देशातील स्पर्धा गाजवल्या आहेत. त्यानंतर त्यानं रणजी क्रिकेट स्पर्धेत पदार्पण केलं.
वैभवचं नाव खऱ्या अर्थानं ऑस्ट्रेलिया A विरुद्ध झळकावलेल्या सेंच्युरीमुळे चर्चेत आलं. त्यानं इंडिया अंडर 19 टीमकडून खेळताना ही कामगिरी केली. वैभवनं त्या इनिंगमध्ये फक्त 58 बॉलमध्येच सेंच्युरी झळकावली होती. त्यानं ऑस्ट्रेलिया A विरुद्ध 64 बॉलमध्ये 104 रन काढले. त्यामध्ये 14 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता.