IND vs ENG: सचिन तेंडुलकरला 'या' बॅट्समनची बॅटींग पहायला आवडते, म्हणाला त्याची बॅटींग पहाणे म्हणेज...

सचिनने त्या बॅट्समनचं कौतूक करताना त्याची बॅटींग पहाणे मला सर्वात जास्त आवडते असंही म्हटलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar) बॅटींग पहाणे सर्वांनाच आवडत होते. तो बॅटींग करायला लागला की सर्वच जण पहात बसायचे. अशी जादू त्याच्या बॅटींगमध्ये होती. तोच सचिन तेंडुलकर मात्र एका बॅट्समनच्या बॅटींगच्या प्रेमात पडला आहे. सचिनने त्या बॅट्समनचं कौतूक करताना त्याची बॅटींग पहाणे मला सर्वात जास्त आवडते असंही म्हटलं आहे. शिवाय त्याच्या फलंदाजीवर फिदा होत त्याला शाब्बासकी ही दिली आहे. स्टार स्पोर्टस बरोबर चर्चा करताना त्याने आपले हे मत व्यक्त केले आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सध्या भारत आणि इंग्लंड यांच्या टी-20 ची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माने जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 79 धावांची धमाकेदार खेळी केली. त्यानंतर सचिन तेंडुलकरने त्याच्या फलंदाजी बाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. सध्याच्या क्रिकेटमध्ये सर्वात इंटरेस्टींग बॅट्समन जर कोणी असेल तर तो अभिषेक शर्मा आहे असं सचिन म्हणाला आहे. अभिषेक शर्मा हा ओपनिंगचा धडाकेबाज फलंदाज आहे. त्याने तशा खेळ्या केल्या आहेत.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Saif Ali Khan Attack : हा तो नव्हेच? सैफ अली खान हल्ला प्रकरणात मुंबई पोलिसांना मोठा धक्का

सचिनने अभिषेक शर्माचे कौतूक केले आहे. अभिषेक शर्माला खेळताना मी त्याचा खेळ पाहातच राहातो. त्याची फलंदाजी मला आवडते. त्याची बॅटींग जबरदस्त आहे. शिवाय त्याच्या भात्यात सर्व स्ट्रोक आहेत. तो दिसायला जरी लहान असला तरी तो मोठे आणि ताकदीचे फटके मारतो. त्याची फलंदाजीची शैली ही सहज आणि सोपी आहे. त्यामुळे तो चांगला खेळाडू  झाला आहे. पुढच्या काळात त्याची हीच शैली त्याला खुप पुढे नेणार आहे असंही सचिन म्हणाला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Guillain Barre Syndrome: पुणेकरांना मोठा दिलासा! GBSच्या पेशंटवर 'या' रुग्णालयात होणार मोफत उपचार

अभिषेक शर्माने गेल्या वर्षी झिम्बाब्वे विरुद्ध टी20 मालिकेतून पदार्पण केले होते. त्याने आपल्या दुसऱ्या सामन्यातच शतक ठोकले होते. आयपीएलमध्ये तो सनराईजर्स हैदराबादकडून खेळतो. मागिल सिजन अभिषेक शर्माने गाजवला होता. त्याच्या फलंदाजी मुळे हैदराबादचा संघ फायनलपर्यंत पोहोचला होता. अभिषेक शर्मा हा भारतीय क्रिकेटमधील दुसरा युवराज सिंग समजला जातो. विशेष म्हणजे युवराज सिंगच्याच मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेतले आहेत. सध्या टी-20 चा स्टार म्हणून त्याच्याकडे पाहीले जाते.  

ट्रेंडिंग बातमी - Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कसे ठरतात? 6 महिन्यांपासून सुरु होते तयारी; वाचा खास माहिती

Advertisement

 सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात टी-20 सिरीज सुरू आहे. पहिला सामन्यानंतर दुसऱ्या सामन्यातही भारताने विजय मिळवला आहे. दुसऱ्या सामन्यात तिलक वर्माने जबरदस्त बॅटींग केली. त्याने 72 धावा केल्या. त्याच्या खेळीने भारताने या सामन्यात विजय मिळवला. टी-20 चे पाच सामने खेळले जाणार आहेत. त्यात दोन सामने भारताने जिंकले आहेत. सिरीज विजयासाठी आणखी एका विजयाची गरज भारताला आहे. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world