Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकर BCCI अध्यक्ष होणार? मास्टर ब्लास्टरच्या टीमनेच दिले स्पष्टीकरण

Sachin Tendulkar To Be Next BCCI President? : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरच्या टीमनं या मुद्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई:

Sachin Tendulkar To Be Next BCCI President? : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची निवड होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. क्रिकेट विश्वातील आजवरचा सर्वात महान खेळाडू म्हणून सचिनची ओळख आहे. सचिन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊन आता 12 वर्ष होत आली आहेत. त्यानंतरही त्याची लोकप्रियता कायम आहे. तो आजही क्रिकेटचा सर्वात मोठा चेहरा आहे. सचिन आता थेट बीसीसीआयचा अध्यक्ष होणार अशी चर्चा सुरु झाल्यानं जगभरातील फॅन्समध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. पण, त्यावर आता सचिनकडून स्पष्टीकरण आलं आहे.

सचिन तेंडुलकरनं बीसीसीआय अध्यक्षपदी त्याच्या नावाला सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चिन तेंडुलकरच्या मॅनेजमेंट टीमनं या सर्व चर्चांना " निराधार" ठरवत त्या फेटाळून लावल्या आहेत.

काय दिलं स्पष्टीकरण?

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि काही माध्यमांमध्ये अशी चर्चा होती की, रॉजर बिन्नी यांच्यानंतर सचिन तेंडुलकर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. बिन्नी यांचा 70 वर्षांचा कार्यकाळ जुलैमध्ये संपल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. मात्र, सचिनच्या व्यवस्थापन कंपनीने एक निवेदन जारी करून या चर्चा चुकीच्या असल्याचे स्पष्ट केले.

( नक्की वाचा : IND vs UAE: सूर्यकुमार यादवची 'खिलाडूवृत्ती', टॉवेलमुळे आऊट झालेल्या खेळाडूला पुन्हा बोलावले, नेमकं काय घडलं? )

निवेदनात म्हटले आहे की, ''श्री. सचिन तेंडुलकर यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदासाठी विचारात घेतले जात आहे किंवा त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, असे काही वृत्त आणि अफवा आमच्या निदर्शनास आल्या आहेत. आम्ही स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की असे कोणतेही घडामोड झालेली नाही. आम्ही सर्वांना विनंती करतो की, निराधार चर्चांवर विश्वास ठेवू नये.''

Advertisement

क्रिकेट विश्वातील  सर्वात श्रीमंत बोर्ड असलेल्या बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत नवीन अध्यक्षांची निवड केली जाईल. ऑक्टोबर 2022 मध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून रॉजर बिन्नी यांची नियुक्ती झाली होती. बीसीसीआयच्या नियमांनुसार, अध्यक्षपदासाठी वयाची मर्यादा 70 वर्षे आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेत बीसीसीआयचे लोकपाल (ombudsman) आणि नैतिक अधिकारी (ethics officer) यांचीही नियुक्ती केली जाणार आहे.


 

Topics mentioned in this article