Sanju Samson : 'माझा प्रवास खरोरच सुंदर...' राजस्थान रॉयल्स सोडण्याच्या चर्चेवर संजूनं सोडलं मौन

Sanju Samson: आयपीएल 2026 पूर्वी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sanju Samson : संजू सॅमसननं सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मुंबई:


Sanju Samson Breaks Silence On Leaving Rajasthan Royals: आयपीएल 2026 पूर्वी संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स सोडणार ही चर्चा सध्या जोरात सुरु आहे. या विषयावर सोशल मीडियावर रोज नव्या गोष्टी प्रसिद्ध होत आहेत. या सर्व चर्चांवर स्वत: संजूनं मौन सोडलं आहे. त्यानं एका मुलाखतीमध्ये या विषयावर प्रतिक्रिया देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

काय म्हणाला संजू ?

रविचंद्रन अश्विनच्या 'कुट्टी स्टोरीज' या यूट्यूब पॉडकास्टमध्ये बोलताना सॅमसन म्हणाला की, "राजस्थान रॉयल्स माझ्यासाठी खूप खास आहे. केरळमधील एका छोट्या गावातून आलेल्या मुलाला आपली प्रतिभा दाखवण्यासाठी एक संधी हवी होती. तेव्हा राहुल सर आणि मनोज बडाले सरांनी मला एक व्यासपीठ दिलं. त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास दाखवला आणि मी काय करू शकतो हे जगाला दाखवण्याची संधी दिली. आरआर सोबतचा माझा प्रवास खरंच खूप छान राहिला आहे आणि अशा फ्रँचायझीचा भाग असल्याचा मला खूप आनंद आहे. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे."

( नक्की वाचा : IPL 2026 : CSK फॅन्ससाठी धक्कादायक बातमी, अश्विन सोडणार टीमची साथ ! नव्या पोस्टनं खळबळ )
 

सॅमसनच्या या थेट उत्तराने त्याच्या राजस्थान रॉयल्स सोडून जाण्याच्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. 2025 च्या सीझनमध्ये सॅमसन दुखापतीमुळे 9 सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता आणि संघ नवव्या स्थानावर राहिला होता. त्यानंतर त्याच्या संघाबाहेर जाण्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. सॅमसन 2013 पासून राजस्थान रॉयल्स संघासोबत आहे.

Topics mentioned in this article