टीम इंडियाचा विकेट किपर बॅटर संजू सॅमसन (Sanju Samson) सध्या क्रिकेटबाह्य कारणामुळे चर्चेत आहे. संजू केरळ क्रिकेट असोसिएशन ( Kerala Cricket Association) मध्ये वाद सुुरु असल्याची माहिती माध्यमांनी दिली होती. विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू खेळला नव्हता. त्यावर संजूनं सराव शिबिरामध्ये भाग न घेतल्यानं त्याचा टीममध्ये समावेश करण्यात आला नाही अशी माहिती केसीएनं दिली होती. संजूचे वडील विश्वनाथ यांनी त्यानंतर मौन सोडत केसीएच्या अधिकाऱ्यांवर मुलाचं करिअर उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. आता विश्वनाथ यांनी या प्रकरणावर बोलताना टीम इंडियाचा माजी हेड कोच आणि संजूचा मेंटॉर राहुल द्रविडचा उल्लेख केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
द्रविडचा आला होता फोन
विश्वनाथ यांनी स्पोर्ट्स टुडेशी बोलताना हा किस्सा सांगितला आहे. त्यांनी मुलाचं करिअर वाचवल्याबद्दल राहुल द्रविडचे आभार मानले आहेत. संजूला आयुष्यातील खडतर कालखंडात द्रविडनं कशी मदत केली याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
विश्वनाथ म्हणाले की, 'केसीएनं संजूकडं दुर्लक्ष करत त्याची कारकिर्द उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी द्रविडनं या प्रकरणात हस्तक्षेप केला. आज संजू जे काही आहे त्याचं श्रेय द्रविडला आहे. त्याचं प्रेम आणि औदार्य मी कधीही विसरु शकत नाही.
( नक्की वाचा : 'माझ्या मुलाचं करियर 4 जणांनी खराब केलं', संजू सॅमसनच्या वडिलांनी घेतली धक्कादायक नावं, Video )
संजूवर कारवाई झाल्यानंतर त्यांनी त्याचे किट आणि इतर साहित्य जमा केले होते. आम्ही सर्वजण दु:खात असताना एके दिवशी घरी संजूला राहुल सरांचा कॉल आला. त्यांचा कॉल आल्यानं संजू खूप आनंदी झाला. त्यानं फोन उचलला. तो फोनवर रडत होता. संपूर्ण घरातील वातावरण तेव्हा दु:खी होेते, ' असं विश्वनाथ यांनी सांगितले.
संजूनं फोन ठेवल्यानंतर राहुल सरांनी त्याच्याशी काय बोलले त्याची माहिती त्यानं मला दिली. राहुल सर त्याला म्हणाले, 'संजू तुझ्याबाबतीत काय घडलंय हे मी समजू शकतो. ते सर्वजण तुझ्यावर जळतात. तू काळजी करु नकोस. हताश होऊ नकोस. मी सर्व गोष्टी पाहून घेईल. तू सराव करत राहा. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये येण्यासाठी रेडी राहा. द्रविड केसीएपेक्षाही वरच्या पातळीवर काम करत होता. त्यानं संजूला त्याच्या पंखाखाली घेतलं, ' असं विश्वनाथ यांनी सांगितलं.
( नक्की वाचा : दमदार कामगिरीनंतरही संजू सॅमसन अडचणीत! BCCI करणार 'या' निर्णयाची चौकशी )
संजू सॅमसनचा चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये समावेश करण्यात आलेला नाही. पण, भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 सीरिजसाठी तो टीममध्ये आहे. कोलकातामध्ये झालेल्या पहिल्या T20 सामन्यात संजूनं 20 बॉलमध्ये 26 रन्स काढले. त्यानं या खेळीत 4 फोर आणि 1 सिक्स लगावला. अभिषेक शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 41 रनची पार्टनरशिप केली. अभिषेक शर्मानं त्या मॅचमध्ये 34 बॉलमध्ये 77 रन केले. त्याच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं पहिला सामना 7 विकेट्सनं सहज जिंकला.