Sarfaraz Khan : 6,4,6,4...सर्फराज खाननं फक्त 15 बॉलमध्ये केला ऐतिहासिक रेकॉर्ड, अभिषेक शर्माची काढली हवा!

Sarfaraz Khan Achieves Huge Record : मुंबईकर सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये नवा इतिहास घडवला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sarfaraz Khan : विजय हजारे ट्रॉफीमध्ये सरफराज चांगल्याच फॉर्मात आहे.
मुंबई:

Sarfaraz Khan Achieves Huge Record : मुंबईकर सरफराज खानने विजय हजारे ट्रॉफीमध्ये नवा इतिहास घडवला आहे. त्याने केवळ 15 बॉल्समध्ये सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी झळकावण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात स्थान न मिळाल्याने चर्चेत असलेल्या सरफराजने आपल्या बॅटिंगमधून निवड समितीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईच्या या बॅटरने यापूर्वी बडोद्याच्या अतीत शेठने 2020-21 मध्ये छत्तीसगडविरुद्ध 16 बॉल्समध्ये केलेल्या हाफ सेंच्युरीचा रेकॉर्ड मोडला आहे, आहे.

सरफराजची तुफानी बॅटिंग

मैदानात उतरल्यापासूनच सरफराजने पंजाबच्या बॉलर्सवर तुफान हल्ला चढवला. त्याने अभिषेक शर्माच्या एका ओव्हरमध्ये तब्बल 30 रन (6,4,6,4, 6, 4) कुटले. ज्यामुळे प्रेक्षकही थक्क झाले. सरफराजची ही वादळी खेळी 20 बॉल्समध्ये 62 रन करून संपली, ज्यामध्ये त्याने 7 फोर आणि 5 उत्तुंग सिक्सर्स मारले. मयंक मार्कंडेने त्याला बाद करत पंजाबला मोठा दिलासा मिळवून दिला.

रोमहर्षक लढतीत मुंबईचा अवघ्या 1 रनने पराभव

सरफराजच्या या ऐतिहासिक खेळीनंतरही मुंबईला विजयाचा उंबरठा ओलांडता आला नाही. पंजाबविरुद्धचा हा विजय हजारे ट्रॉफीमधील सामना मुंबईने केवळ 1 रनने गमावला. 216 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात खराब झाली होती. अंगकृष रघुवंशी 23 रन आणि मुशीर खान 21 रन करून स्वस्तात बाद झाले. त्यानंतर सरफराजने आक्रमक खेळी करत मुंबईला विजयाच्या जवळ नेले होते.

( नक्की वाचा : Sarfaraz Khan : सरफराज खानला मिळालं नवीन आयुष्य;अनाया बांगरची खास प्रतिक्रिया, वाचा काय आहे दोघांचं नातं )

कॅप्टन श्रेयस अय्यरने 45 रनची खेळी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील मयंक मार्कंडेचा शिकार ठरला. त्यानंतर आलेले सूर्यकुमार यादव 15 रन, शिवम दुबे 12 रन आणि हार्दिक तामोरे 15 रन करून बाद झाले, ज्यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले. पंजाबकडून गुर्नूर ब्रार आणि मयंक मार्कंडे यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Advertisement

पंजाब टॉपवर 

याआधी टॉस हारल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करताना पंजाबने 216 रन् केले होते. रमणदीप सिंगने 74 बॉल्समध्ये सर्वाधिक 72 रन केले, तर अनमोलप्रीत सिंगने 75 बॉल्समध्ये 57 रनची संयमी खेळी केली. मुंबईकडून बॉलिंग करताना मुशीर खानने 3 विकेट्स घेतल्या, तर ओंकार टर्माळे, शिवम दुबे आणि शशांक अत्तरदे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

या विजयामुळे पंजाबने ग्रुप सी च्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आहे. विशेष म्हणजे, पराभव होऊनही मुंबई आणि विजय मिळवलेला पंजाब हे दोन्ही संघ आधीच क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरले आहेत. सरफराजच्या या रेकॉर्डब्रेक खेळीने मात्र क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा त्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरू केली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article