Video: सचिन तेंडुलकर Out की Not Out? 22 वर्षांनंतर बकनर यांनी सोडलं मौन, सर्वात मोठ्या वादावर खळबळजनक खुलासा

Sachin Tendulkar Steve Buckner Controversy: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्टमध्ये ब्रिस्बेनच्या मैदानावरील तो प्रसंग आजही भारतीय फॅन्स विसरलेले नाहीत.

जाहिरात
Read Time: 2 mins
Sachin Tendulkar Steve Buckner Controversy: या प्रकरणावर बकनर यांनी मौन सोडले आहे.
मुंबई:

Sachin Tendulkar Steve Buckner Controversy: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्टमध्ये ब्रिस्बेनच्या मैदानावर घडलेल्या त्या एका चुकीच्या निर्णयाला आता 22 वर्षे पूर्ण झाली आहेत. पण आजही भारतीय क्रिकेट फॅन्सच्या मनात तो प्रसंग जसाच्या तसा ताजा आहे. क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला ज्या पद्धतीने एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आले होते, त्यावरून तेव्हा जगभरात मोठा वाद निर्माण झाला होता. आता तब्बल दोन दशकांनंतर वेस्ट इंडिजचे माजी पंच स्टीव्ह बकनर यांनी अखेर या प्रसंगवार त्यांचे मौन सोडले आहे.

काय म्हणाले बकनर?

वेस्ट इंडिज क्रिकेट अंपायर्स असोसिएशनशी बोलताना बकनर यांनी  मान्य केले की सचिन तेंडुलकरला आऊट देण्याचा निर्णय चुकीचा होता. बकनर यांच्या मते, तो चेंडू स्टंपला लागलाच नसता आणि तो चेंडू मिस होत होता. तरीही त्यांनी सचिनला आऊट ठरवले होते.स्वत:च्या चुकीची कबुली देताना बकनर म्हणाले की, सचिनला LBW  देणे ही एक चूक होती हे मला ठाऊक आहे, पण आजही लोक त्याबद्दल चर्चा करतात.

लाज नाही

आपल्या निर्णयाचे समर्थन करण्याऐवजी बकनर यांनी स्पष्टपणे सांगितले की, आयुष्यात चुका घडत असतात आणि मी ती चूक स्वीकारली आहे. तो चेंडू खेळताना सचिन बाद होता की नव्हता यावर आजही लोक मला प्रश्न विचारतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. बकनर यांनी त्यांच्या कारकिर्दीत सचिनविरुद्ध दिलेले अनेक निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते, पण 2003-04 च्या मालिकेतील त्या निर्णयाने संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले होते.

( नक्की वाचा : Pakistan Cricketer :'तो तर खुनी आहे'; पाकिस्तानच्या स्टार क्रिकेटरवर माजी पत्नीचे अंगावर काटा आणणारे आरोप )

नेमकं काय घडलं होतं ?

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्या सामन्यात जेसन गिलेस्पीचा चेंडू सचिनने सोडून देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो चेंडू थेट त्याच्या पॅडला लागला. ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जोरात अपील केल्यावर स्टीव्ह बकनर यांनी आपले बोट आकाशात उंचावले. तेव्हा सचिन केवळ 3 रनवर खेळत होता. टीव्हीवर रिप्ले पाहिल्यानंतर तो चेंडू स्टंपच्या बराच वरून जात असल्याचे स्पष्ट झाले होते. समालोचक टोनी ग्रेग यांनीही त्यावेळी हा अतिशय भयंकर निर्णय असल्याचे म्हटले होते.

Advertisement

सचिननेही लगावला होता टोला

काही काळापूर्वी सचिन तेंडुलकरला स्टीव्ह बकनर यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा सचिनने आपल्या खास शैलीत उत्तर दिले होते की, जेव्हा मी बॅटिंग करत असेन तेव्हा बकनर यांना बॉक्सिंग ग्लोव्हज घालायला दिले पाहिजेत, जेणेकरून त्यांना आपले बोट वर करता येणार नाही. बकनर यांच्या आताच्या कबुलीमुळे दोन दशकांपासून सुरू असलेल्या या वादावर अखेर पडदा पडला आहे.
 

Topics mentioned in this article