'मुंबई से आया मेरा दोस्त...', अफगाणिस्तानच्या विजयानंतर राशिदची पोस्ट चर्चेत

अफगाणिस्तानने पहिल्यांदा टी 20 सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच ऑस्ट्रेलियाचा संघ आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins

वर्ल्ड कप सुपर 8 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांगालदेशचा 8 धावांनी परभव केला. अफगाणिस्तानने पहिल्यांदा टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सोबतच ऑस्ट्रेलियाचा संघ आता स्पर्धेतून बाहेर झाला आहे. त्याआधी टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत सेमीफायनमध्ये आपलं स्थान निश्चित केलं होतं. मात्र सेमीफायनलमधील एका जागेसाठी अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामना महत्त्वाचा होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बांगलादेश जिंकावं असं ऑस्ट्रेलियाला वाटत असावं. कारण बांगलादेशने हा सामना जिंकला असता तर नेट रन रेटच्या आधारे ऑस्ट्रेलिया सेमीफायनलसाठी पात्र झाली असती. मात्र अफगाणिस्तानने बांगलादेशला पराभूत करत थेट सेमीफयनलमध्ये धडक मारली आहे. 

(नक्की वाचा- Video : कोचनं इशारा करताच मैदानात धाडकन पडला अफगाणिस्तानचा खेळाडू, नेमकं काय घडलं?)

राशिद खानची सोशल मीडिया पोस्ट

अफगाणिस्तानने सेमीफायनलमधील आपलं स्थान पक्कं केल्यानंतर जगभरातून या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अनेक दिग्गजांनी अफगाणिस्तानचा उत्साह वाढवला. दरम्यान राशिद खानने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला, जो प्रचंड व्हारल होत आहे.

Advertisement

(नक्की वाचा- अफगाणिस्तान जिंकताच संपूर्ण देश रस्त्यावर... असं सेलिब्रेशन तुम्ही कधी पाहिलं नसेल, Video)

राशिदने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला त्याने 'मुंबई से आया मेरा दोस्त'  असं कॅप्शन दिलं आहे. राशिदचे अनेक भारतीय खेळाडूंसोबत चांगले संबंध आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्यासोबतची राशिदची मैत्री आयपीलएमध्ये दिसून येते.त्यामुळे राशिदची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

Topics mentioned in this article