Rohit Sharma : एक कॅप्टन... रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीरच्या पोस्टची फॅन्समध्ये चर्चा

Gautam Gambhir on Rohit Sharma : टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरनं सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर रोहितच्या टेस्ट क्रिकेटवर त्याचं मत व्यक्त केलं

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Gautam Gambhir on Rohit Sharma's retirement from test : रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील आगामी टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाला नवा कॅप्टन शोधावा लागेल. गेल्या वर्षी वन-डे वर्ल्ड कपनंतर रोहित आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्यामुळे तो फक्त वन-डे क्रिकेटमध्ये भारतीय टीमची कॅप्टनसी करेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहितनं इन्स्टाग्रामवर पोस्ट करत या विषयाची माहिती सर्वांना दिली. रोहितनं या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'सर्वांना नमस्कार. मला फक्त हे सांगायचे आहे की मी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. पांढऱ्या जर्सीमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट होती. इतके वर्ष मला दिलेले प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद. मी वन-डे फॉरमॅटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व पुढंही करेल.'

( नक्की वाचा : India's Squad For England Tour : चांगल्या कामगिरीनंतरही बुमराहला बसणार धक्का, BCCI च्या मनात काय? )
 

रोहितनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घोषणा केल्यानंतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरनं सोशल मीडिया नेटवर्क एक्सवर रोहितच्या टेस्ट क्रिकेटवर त्याचं मत व्यक्त केलं. गंभीरनं एक्सवर एका ओळीची प्रतिक्रिया दिली आहे. त्याची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

गौतम गंभीरनं त्याच्या पोस्टमध्ये 'एक मास्टर, एक कॅप्टन आणि एक रत्न' या तीन शब्दामध्ये रोहितचं वर्णन केलंय. त्याच्या या प्रतिक्रियेची सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. 

Advertisement

रोहित शर्माचा टेस्ट रेकॉर्ड

रोहितनं 67 टेस्टमध्ये 40.57 च्या सरासरीनं 4301 रन्स केले. त्यामध्ये 12 सेंच्युरी आणि 18 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. 

2023 साली झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये रोहित शर्मानं टीम इंडियाचं नेतृत्त्व केलं होतं. पण, भारतीय टीमनं तो सामना गमावला. रोहितच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धची टेस्ट सीरिज मायदेशात गमावली. तसंच ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारतीय टीम पराभूत झाली. 

या दोन्ही सीरिजमध्ये रोहित बॅटर म्हणून सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याची कर्णधारपदावरुन हकालपट्टी करण्यात येणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत होती. पण, त्यापूर्वीच रोहितनं तातडीनं निवृत्ती जाहीर केली आहे. 

Advertisement


 

Topics mentioned in this article