Test Twenty: 'टेस्ट' आणि 'T20' चा एकत्र धमाका! क्रिकेटमध्ये येतोय पाचवा फॉरमॅट; नियम, वाचा संपूर्ण माहिती

Test Twenty: टेस्ट, वन-डे, T20 आणि T10 नंतर आता क्रिकेटचा आणखी एका नवा फॉरमॅट सुरु झाला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Test Twenty: टेस्ट क्रिकेटमधील कस आणि T20 चा थरार यांचा संगम या प्रकारात करण्यात आल्याचा आयोजकांचा दावा आहे.
मुंबई:

Test Twenty: टेस्ट, वन-डे, T20 आणि T10 नंतर आता क्रिकेटचा आणखी एका नवा फॉरमॅट सुरु झाला आहे. या पाचव्या फॉरमॅटचे नाव आहे 'टेस्ट ट्वेंटी' (Test Twenty). यात एकूण 80 ओव्हर्सचा खेळ असेल. टेस्ट क्रिकेटमधील कस आणि T20 चा थरार यांचा संगम या प्रकारात करण्यात आल्याचा आयोजकांचा दावा आहे.  या फॉरमॅटचा उद्देश 18 वर्षांखालील तरुण क्रिकेटपटूंना क्रिकेटच्या भविष्यासाठी तयार करणे आहे. कसा आहे हा फॉरमॅट? कुणाला खेळता येईल? यामध्ये वेगळेपण काय आहे? या आणि अन्य सर्व प्रश्नांची उत्तरे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

काय आहे हा 'टेस्ट ट्वेंटी' फॉरमॅट?

हा फॉरमॅट विशेषतः 13 ते 19 वयोगटातील तरुण क्रिकेटपटूंसाठी तयार करण्यात आला आहे.

खेळाचे स्वरूप: एका मॅचमध्ये 20 ओव्हर्सच्या चा इनिंग असतील. म्हणजेच, प्रत्येक टीम एका सामन्यात टेस्ट मॅचप्रमाणे दोन वेळा बॅटिंग करेल.

कालावधी: संपूर्ण सामना एकाच दिवसात पूर्ण होईल.

पारंपरिकता: हा सामना टेस्ट क्रिकेटप्रमाणे पांढऱ्या जर्सीत आणि लाल चेंडूने (red-ball) खेळला जाईल.

रन्स : दोन्ही इनिंगचे रन्स पुढे नेले जातील. म्हणजेच निर्णायक निकाल एकत्रित स्कोअरवर आधारित असेल.

निकाल: सामन्याचा निकाल विजय, पराभव, टाय (tie) किंवा ड्रॉ (draw) यापैकी काहीही लागू शकतो.

महत्त्वाचे नियम

या फॉरमॅटमध्ये कसोटी आणि T20 क्रिकेटच्या नियमांचे मिश्रण करण्यात आले आहे
पॉवरप्ले: प्रत्येक टीम संपूर्ण सामन्यात फक्त चार ओव्हर्सचा पॉवर प्लेचा (PowerPlay) वापर करू शकेल.
फॉलो-ऑन: पहिल्या इनिंगमध्ये 75  किंवा त्याहून जास्त रन्सची अधिकची आघाडी मिळाल्यास, प्रतिस्पर्धी संघावर फॉलो-ऑन (follow-on) लादता येईल.
ओव्हर्सचा कोटा: एका टीममधून जास्तीत जास्त पाच बॉलर्सना बॉलिंग करण्याची परवानगी असेल. त्यापैकी प्रत्येक बॉलर कमाल आठ ओव्हर्स (eight overs) टाकू शकेल.

( नक्की वाचा : Virat Kohli : विराट कोहलीचा RCB ला नकार! व्यावसायिक करार नाकारल्याने एक्झिटच्या चर्चांना उधाण )
 

कधी होणार पदार्पण?

'टेस्ट ट्वेंटी' चे उद्घाटन सत्र जानेवारी 2026 मध्ये सुरू होणार आहे.

ठिकाण: पहिला सिझन भारतात आयोजित केले जाईल आणि सध्या फक्त मुलांसाठीचा (boys format) असेल. मुलींसाठीचे सामने दुसऱ्या सिझनपासून सुरू होतील.

फ्रँचायझी (Franchises): यामध्ये एकूण सहा जागतिक फ्रँचायझींचा समावेश असेल - तीन भारतीय शहर-आधारित टीम आणि तीन आंतरराष्ट्रीय टीम (दुबई, लंडन आणि अमेरिकेतील एक). यांचा यामध्ये समावेश असेल.

खेळाडू: प्रत्येक फ्रँचायझी संघात 16 खेळाडू असतील, ज्यात आठ भारतीय आणि आठ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश असेल.

कुठे करणार नोंदणी?

या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्यासाठी, 13 ते 19 वयोगटातील क्रिकेटपटूंसाठी नोंदणी प्रक्रिया 16 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7:00 PM IST वाजता सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक www.testwenty.com/register या संकेतस्थळावर नावनोंदणी करू शकतात.

Advertisement

( नक्की वाचा : Sachin Tendulkar: 10 रुपयांचा शेअर थेट 9 हजारांवर! 'क्रिकेटचा देव'च ठरला शेअरमागचा 'खेळाडू'? कंपनीनं मौन सोडलं )
 

या संकल्पनेमागे कोण आहेत?

'टेस्ट ट्वेंटी' ही संकल्पना 'द वन वन सिक्स नेटवर्क' (The One One Six Network) चे कार्यकारी अध्यक्ष, क्रीडा उद्योजक गौरव बहिरवानी (Gaurav Bahirvani) यांची आहे. याशिवाय, सर क्लाइव्ह लॉयड (Sir Clive Lloyd), मॅथ्यू हेडन (Matthew Hayden), एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांसारखे दिग्गज क्रिकेटपटू 'टेस्ट ट्वेंटी'च्या सल्लागार मंडळात (advisory board) आहेत.

आयसीसीची मान्यता आहे का?

सध्या तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 'टेस्ट ट्वेंटी' ला मान्यता दिलेली नाही आणि हे एक खासगी (privately managed) आयोजन आहे. आयसीसी फक्त एकदिवसीय (ODIs), कसोटी (Test) आणि टी-२० आंतरराष्ट्रीय (T20Is) या तीनच फॉरमॅट्सना मान्यता देते.

Advertisement

हा नवा आणि वेगळा फॉरमॅट युवा खेळाडूंना क्रिकेटच्या भविष्यासाठी नक्कीच तयार करेल. यातून कोणता नवीन सुपरस्टार उदयास येतो याची सर्वांना उत्सुकता आहे.
 

Topics mentioned in this article