Rohit Sharma: 'मला हेच सांगण्यात आलंय...' निवृत्तीच्या चर्चेवर रोहित शर्माने दिलं थेट उत्तर, पाहा VIDEO

Rohit Sharma retirement news: लॉर्ड्सवरील सेंच्युरीनंतर बीसीसीआयला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये 'हिटमॅन'नं पहिल्यांदाच या संपूर्ण विषयावर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Rohit Sharma retirement news: भारत विरुद्ध इंग्लंड सीरिजनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती.
मुंबई:

Rohit Sharma retirement news: इंग्लंडविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये पराभव झाला असला तरी रोहित शर्मानं दमदार सेंच्युरी झळकावत त्याचा क्लास दाखवून दिलाय. या सीरिजनंतर रोहित शर्मा निवृत्त होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. ऐतिहासिक लॉर्ड्सवर वन-डे क्रिकेटमध्ये सेंच्युरी झळकावणारा पहिला भारतीय बनत रोहितनं निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. या सेंच्युरीनंतर बीसीसीआयला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये 'हिटमॅन'नं पहिल्यांदाच या संपूर्ण विषयावर स्पष्ट शब्दात उत्तर दिलं आहे. 

काय म्हणाला रोहित?

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये रोहितला केवळ 11 आणि 26 रन करता आले होते. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित केले जात होते आणि तिसऱ्या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेईल अशा चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना रोहितने स्पष्ट केले की, "माझं काम बॅटने उत्तर देणं हेच आहे. मैदानावर यायचं, खेळायचं आणि माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करायचं. जेव्हापासून मी पदार्पण केलंय, तेव्हापासून मला हेच सांगण्यात आलंय आणि मी तेच करत राहणार आहे.

Advertisement

(नक्की वाचा : ICC World Cup: ओळखा पाहू वर्ल्ड कपचे संपूर्ण स्वरुप कुणासाठी बदलले? आयसीसीच्या निर्णयामागचं खरं गुपित उघड )

मी पदार्पण केल्यापासूनच बाहेर असा गदारोळ सुरू होता आणि मी जोपर्यंत खेळत राहीन, तोपर्यंत हा असा आवाज सुरूच राहणार आहे. त्याने मला काही फरक पडत नाही. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी मैदानावर काय करतो. मला फक्त टीमच्या विजयात योगदान द्यायचं आहे आणि माझं संपूर्ण लक्ष याच गोष्टीवर केंद्रित आहे."

मालिकेतील तिसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर रोहितने अप्रतिम खेळ दाखवला. त्याने फक्त 110 बॉल्समध्ये 138 रनची धडाकेबाज इनिंग खेळली. या इनिंगमध्ये त्याने 17 फोर आणि 5 सिक्स मारले. दुर्दैवाने भारताला या सामन्यात 27 रनने पराभव स्वीकारावा लागला आणि इंग्लंडने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. मात्र रोहितच्या सेंच्युरीनं  त्याच्या फॉर्मबद्दल शंका घेणाऱ्यांची तोंडे बंद केली.

बीसीसीआय आणि कॅप्टनचं धोरण काय?

रोहितच्या निवृत्तीच्या अफवांवर आधीच बीसीसीआयचे सचिव देवाजीत सैकिया यांनी स्पष्टीकरण दिले होते. इंग्लंड मालिकेनंतरही रोहित भारतासाठी खेळत राहील असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल यानेही या चर्चा फेटाळून लावल्या. ड्रेसिंग रूममध्ये किंवा टीममध्ये रोहितच्या निवृत्तीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, असे गिलने पत्रकार परिषदेत सांगितले होते.

Advertisement

रोहित कशासाठी खेळतोय?

रोहितने टी-20 आणि टेस्ट क्रिकेटमधून आधीच निवृत्ती घेतली असून तो आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतो. 2027 मध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची त्याची तीव्र इच्छा आहे. लहानपणापासून 50 ओव्हर्सचा वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पाहिल्याचे सांगत हा ट्रॉफी जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे रोहितने याआधीच स्पष्ट केले आहे.