Australia big players will not go on Pakistan tour: क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. ऑस्ट्रेलिया टीम नोव्हेंबर महिन्यात पाकिस्तानचा दौरा करणार आहे. पण, या दौऱ्यावर टीममधले अनेक मोठे खेळाडू न जाण्याची शक्यता आहे. साधारण त्याच काळात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आहे. भारताविरुद्ध होणारी ही टेस्ट सीरिज ऑस्ट्रेलियासाठी प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध मर्यादीत ओव्हर्सचे रेड बॉल क्रिकेट खेळल्यापेक्षा ऑस्ट्रेलियन खेळाडू टेस्ट सीरिज खेळण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कॅप्टन पॅट कमिन्स, वर्ल्ड कप फायनल हिरो ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श मिचेल स्टार्क, जोश हेजलवुडसह अनेक दिग्गज खेळाडू पाक दौऱ्यावर न जाण्याच्या तयारीत आहेत. ऑस्ट्रेलियन टीम पाकिस्तान दौऱ्यावर 3 वन-डे आणि 3 T20 मॅच खेळणार आहे. वन-डे सीरिजची सुरुवात 4 नोव्हेंबरपासून होईल. तर, T20 मॅचची सीरिज 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
याबाबत प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार ऑस्ट्रेलियाचे तीन्ही फॉर्मेट खेळणारे खेळाडूंना भारत दौऱ्यासाठी तयार व्हायला पुरेसा वेळ हवा आहे. त्यामुळे हेड, कमिन्स, स्टार्क, मार्श, हेजलवुड हे खेळाडू पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या T20 सीरिजमधून बाहेर राहू शकतात.
( नक्की वाचा : IPL 2025 : T20 वर्ल्ड कप गाजवणारा भारताचा सुपरस्टार होणार पंजाब किंग्जचा कोच? )
या खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये जेक फ्रेजर मॅकगर्क, मॅथ्यू शॉर्ट, नॅथन एलिस आणि आरोन हार्डी या खेळाडूंना पाकिस्तान विरूद्धच्या सीरिजमध्ये संधी मिळू शकते. या खेळाडूंनी गेल्या काही दिवसांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. मॅकगर्कनं तर आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना सर्वांनाच प्रभावित केलं होतं.