Vaibhav Suryavanshi: दीड वर्षांचा मोठा घोळ अन् नवा वाद; वैभव सूर्यवंशी खरंच 15 वर्षांचा आहे का?

Vaibhav Suryavanshi Age Controversy:  आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटिंगने जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेणारा तरु खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vaibhav Suryavanshi: खेळाडूचं वय मोजण्याची बीसीसीआयची पद्धत काय आहे?
मुंबई:

Vaibhav Suryavanshi Age Controversy:  आयपीएल 2026 मध्ये आपल्या बॅटिंगने जगभरातील क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधून घेणारा तरु खेळाडू वैभव सूर्यवंशी सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. अवघ्या 15 वर्षांच्या या बॅटरने मैदानात धावांचा पाऊस पाडला असला तरी, त्याच्या वयावरून मात्र सोशल मीडियावर मोठा वाद रंगला आहे. या वादाची ठिणगी त्याच्या एका जुन्या मुलाखतीमुळे पडली असून, आता त्याच्या खऱ्या वयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

वयाचा नेमका वाद काय आहे?

या वादाची मुळे वैभवने 2023 मध्ये दिलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत आहेत. त्या मुलाखतीत वैभवने स्वतः असे म्हटले होते की, तो सप्टेंबर 2023 मध्ये 14 वर्षांचा होईल. मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकृत कागदपत्रांनुसार त्याची जन्मतारीख 27 मार्च 2011 अशी नोंदवण्यात आली आहे. या हिशोबाने 2023 मध्ये त्याचे वय केवळ 12 वर्षे असायला हवे होते. स्वतःच्या वक्तव्यात आणि कागदपत्रांमध्ये दीड वर्षांचा फरक आढळल्याने सोशल मीडियावर त्याच्यावर वय चोरीचे आरोप होत आहेत. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज जुनैद खान यानेही या मुद्द्यावरून वैभवला लक्ष्य केले आहे.

Advertisement

बीसीसीआय आणि बोन टेस्ट

बीसीसीआयनं यापूर्वीच वैभवची बोन टेस्ट केली आहे. आहे, ज्यामध्ये त्याचे वय नियमानुसार असल्याचे स्पष्ट झाले होते. तरीही आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्याने केलेल्या तुफानी फटकेबाजीनंतर हा जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. खेळाडूंच्या वयाची खात्री करण्यासाठी क्रीडा विश्वात आणि वैद्यकीय क्षेत्रात काही विशेष चाचण्या केल्या जातात.

( नक्की वाचा : IPL 2026: 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीनं मोडला ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड, मिळालं नवं नाव! )

वयाची खात्री करण्याच्या 3 शास्त्रीय पद्धती

कोणत्याही व्यक्तीचे नेमके वय जाणून घेण्यासाठी आधुनिक वैद्यकीय शास्त्रात काही महत्त्वाच्या चाचण्या उपलब्ध आहेत:

दात आणि ओडोंटोलॉजी विश्लेषण

वयाची खात्री करण्यासाठी दात हा सर्वात अचूक मार्ग मानला जातो, विशेषतः 25 वर्षांपर्यंतच्या तरुणांसाठी ही पद्धत प्रभावी ठरते. यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ दातांच्या मुळांचे कॅल्सीफिकेशन आणि दात येण्याच्या क्रमाचे मूल्यांकन करतात. लहान मुलांच्या बाबतीत डेमिरजियन पद्धत वापरून दातांच्या मुळांच्या आकारावरून वयाचा अंदाज लावला जातो.

( नक्की वाचा : एका फोन कॉलने लग्न लांबवलं आणि रचला इतिहास! कोण आहे हा खेळाडू ज्याने RCB ला पहिल्यांदा चॅम्पियन बनवलं )

हाडांची ओसिफिकेशन चाचणी

या पद्धतीत शरीरातील हाडांच्या वाढीचा अभ्यास केला जातो. मानवी शरीराच्या विकासाच्या टप्प्यात लांब हाडांमध्ये ग्रोथ प्लेट्स असतात. या प्लेट्स एकमेकांना जोडण्याच्या प्रक्रियेचे विश्लेषण करून वयाचा अचूक अंदाज बांधता येतो. प्रौढ व्यक्तींच्या बाबतीत पेल्विसमधील बदलांच्या आधारे वय तपासले जाते.

मॉलिक्यूलर आणि बायोमार्कर पद्धत

प्रत्येक व्यक्तीचे जैविक वय हे त्याच्या कागदपत्रांवरील वयापेक्षा वेगळे असू शकते. हे तपासण्यासाठी डीएनए मधील एपीजेनेटिक क्लॉक्स आणि टीलोमीयरची लांबी मोजली जाते. बायोमार्करच्या मदतीने केल्या जाणाऱ्या या चाचण्या अत्यंत आधुनिक आणि अचूक मानल्या जातात.
 

Advertisement