IPL 2026: 6, 6, 6, 6, 6, 6, 6... वैभव सूर्यवंशीनं मोडला ख्रिस गेलचा सर्वात मोठा रेकॉर्ड, मिळालं नवं नाव!

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 record : T20 क्रिकेटमधील युनिव्हर्स बॉसख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक रेकॉर्ड अखेर मोडला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 record : या वादळी खेळीनं वैभवला आता एक नवं नाव देण्यात आलं आहे. 
मुंबई:

Vaibhav Sooryavanshi IPL 2026 record : T20 क्रिकेटमधील युनिव्हर्स बॉसख्रिस गेलचा 14 वर्षांपूर्वीचा तो ऐतिहासिक रेकॉर्ड अखेर मोडला आहे. राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीनं अपेक्षेप्रमाणे हा रेकॉर्ड मोडला. आयपीएल 2026 च्या एलिमिनेटर सामन्यात हैदराबादच्या बॉलर्सची अक्षरशः धुलाई करत वैभवाने एका सीझनमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा गेलचा विक्रम इतिहासजमा केला. त्याच्या या वादळी खेळीनं त्याला आता एक नवं नाव देण्यात आलं आहे. 


ख्रिस गेलचा रेकॉर्ड आता भूतकाळ

या सामन्यात वैभवाने 7 सिक्स मारले आणि ख्रिस गेलचा 2012 मधील एका सीझनमध्ये 59 सिक्स मारण्याचा विक्रम मोडीत काढला. या तुफानी सीझनमध्ये वैभवाच्या नावावर आता एकूण 65 सिक्सची नोंद झाली आहे. मैदानातील जायंट स्क्रीनवर 'युनिव्हर्स बेबी बॉस' असा उल्लेख होताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला. ख्रिस गेलला 'युनिव्हर्स बॉस' म्हटले जाते, पण आता या 15 वर्षांच्या पोराने त्यालाही मागे टाकले आहे.

Advertisement

अवघ्या 16 बॉलमध्ये हाफ सेंच्युरीचा धमाका

वैभवाने मैदानात पाऊल ठेवल्यापासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने केवळ 16 बॉलमध्ये आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली, जी आयपीएलच्या बाद फेरीतील सर्वात वेगवान हाफ सेंच्युरी ठरली आहे. त्याने सुरेश रैनाच्या 2014 मधील 16 बॉलच्या रेकॉर्डची बरोबरी केली. एकूण 29 बॉलमध्ये 97 रनची खेळी करताना वैभवाने 12 सिक्स आणि 5 फोर मारले.

आज वैभव ज्या पद्धतीने खेळत होता, ते पाहता ख्रिस गेलचा 30 बॉलमध्ये सेंच्युरी करण्याचा ऑल-टाईम रेकॉर्ड धोक्यात आला होता. मात्र, 29 बॉलमध्ये 97 रनवर तो बाद झाला आणि हा मोठा रेकॉर्ड अवघ्या 3 रननी वाचला. असे असले तरी, त्याने पॉवरप्लेमध्ये (1 ते 6 ओव्हरमध्ये) तब्बल 8 सिक्स मारून नवा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. यापूर्वी सनथ जयसूर्या आणि जोस बटलर यांनी पॉवरप्लेमध्ये 7 सिक्स मारले होते.


( नक्की वाचा : IPL 2026: RCB 'फायनली' तयार, विजेतेपदापासून एक पाऊल दूर, वाचा कॅप्टनच्या खेळीनं कसं बदललं टीमचं भविष्य!

टीम इंडियात लवकरच एन्ट्री?

या आयपीएल सीझनमध्ये आतापर्यंत 583 रन करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची चर्चा आता थेट टीम इंडियाच्या निवडीसाठी सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या इंडिया-ए टीममध्ये त्याचा समावेश निश्चित मानला जात आहे. आयपीएल चेअरमन अरुण धुमल यांनीही वैभवचे कौतुक करताना त्याला एक 'स्पेशल टॅलेंट' म्हटले असून बीसीसीआय त्याच्या प्रगतीसाठी विशेष लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
 

Topics mentioned in this article