Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीची 'या' बॉलरपुढं शरणागती, मेडन ओव्हर खेळली आणि विकेटही गेली! सर्वत्र चर्चा

LSG vs RR IPL 2026: लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात भलतंच घडलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीचं लखनौच्या 'या' बॉलरपुढं काहीच चाललं नाही.
मुंबई:

LSG vs RR IPL 2026: आयपीएल 2026 मध्ये बुधवारी लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. लखनौचा डाव या सामन्यात 119 धावांवर आटोपला. ते पुर्ण 20 ओव्हर्स ही खेळू शकले नाहीत. राजस्थानचा 40 धावांनी विजय झाला.  पण या निकालापेक्षाही एका खास ओव्हरची क्रिकेट विश्वात सध्या जोरदार चर्चा आहे. 

आयपीएल 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षांचा वंडर बॉय वैभव सूर्यवंशी जोरदार चर्चेत आहे. वैभवनं या सिझनमध्ये जसप्रीत बुमराह, जॉश हेजलवूडसह अनेक दिग्गज बॉलर्सची धुलाई केली आहे. पण लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या सामन्यात भलतंच घडलं. लखनौच्या मोहसीन खान या फास्ट बॉलरच्या संपूर्ण ओव्हरमध्ये वैभवला एकही रन करता आला नाही.  वैभवने मोहसिन खानची वैभवने मोहसिन खानचा पूर्ण ओव्हर मेडन खेळलीच, पण शेवटी स्वत:ची विकेटही त्यालाच बहाल केली. संपूर्ण क्रिकेट विश्वात या ओव्हरची सध्या जोरदार चर्चा आहे. 

Advertisement

सिक्सर किंग वैभवची बॅट का झाली शांत?

आयपीएल 2026 च्या आतापर्यंतच्या 7 सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या पॉवरहिटिंगने सर्वांना वेड लावलं आहे. 221 च्या स्ट्राईक रेटने त्याने 254 रन कुटले आहेत. मात्र, लखनऊ विरुद्ध तो फक्त 11 बॉलमध्ये 8 रनच करू शकला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या संपूर्ण इनिंगमध्ये वैभवला एकही सिक्स मारता आला नाही. दिल्लीच्या प्रिन्स यादवला त्याने सुरुवातीला दोन चौकार मारले खरे, पण त्यानंतर तो मोहसिन खानच्या वेगासमोर पूर्णपणे हतबल दिसला.

( नक्की वाचा : Virat Kohli: विराट कोहलीला नक्की कशा मुली आवडतात? एक्स गर्लफ्रेंडची जबरदस्त प्रतिक्रिया; म्हणाली '12 वर्ष...' )

राजस्थानच्या चौथ्या ओव्हरमध्ये 6 फूट 3 इंच उंचीच्या मोहसिन खानने वैभवची खरी परीक्षा घेतली. या ओव्हरमध्ये मोहसिनने सलग 140 किमी पेक्षा जास्त वेगाने बॉलिंग केली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर मोहसिनने 142 किमी वेगाचा एक धारदार फुलर लेन्थ बॉल टाकला. यावर मोठा शॉट खेळण्याच्या नादात वैभवने आपली विकेट गमावली. दिग्वेश राठीने एक अप्रतिम कॅच घेत वैभवची खेळी संपवली. राजस्थानची टीम आधीच मोहम्मद शमीने घेतलेल्या दोन विकेट्समुळे दबावाखाली होती आणि त्यात वैभवची विकेट गेल्याने त्यांची अवस्था बिकट झाली.

( नक्की वाचा : Rohit Sharma: टीममध्ये नसूनही रोहितच ठरला 'गेमचेंजर'; गुजरातविरुद्ध 'हिटमॅन'ने असा फिरवला सामन्याचा निकाल! )
 

निवडकर्त्यांना मोहसिन खानचा 'स्ट्राँग' मेसेज

उत्तर प्रदेशच्या संभलचा हा 27 वर्षांचा बॉलर आता टीम इंडियाचे दरवाजे ठोठावतोय. लखनऊने त्याला 4 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं आणि तो आता पूर्णपणे फिट दिसत आहे. मोहसिन खान हा केवळ पॉवरप्लेमध्येच नाही, तर डेथ ओव्हर्समध्येही तितकाच घातक ठरतो. राजस्थान विरुद्ध त्याने 4 ओव्हर्समध्ये फक्त 17 रन देत 2 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट अवघा 4.25 राहिला. त्याने वैभव सूर्यवंशी आणि शिमरॉन हेटमायर सारख्या धोकादायक खेळाडूंना माघारी धाडलं.

टीम इंडियासाठी नवा पर्याय?

मोहसिन खानने आयपीएल 2022 मध्ये 6 पेक्षा कमी इकॉनॉमीने 14 विकेट्स घेतल्या होत्या. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 27 रन देऊन 6 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. सध्याच्या फॉर्ममध्ये तो अजित अगरकर आणि निवड समितीला विचार करायला भाग पाडत आहे. संभल एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा हा डावखुरा वेगवान गोलंदाज टीम इंडियाला हवी असलेली ती उणीव भरून काढू शकतो का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Advertisement
Topics mentioned in this article