क्रिकेटमध्ये असे काही किस्से असतात जे फार कमी लोकांना माहित असतात. किंवा ते फारसे सार्वजनिक पणे सांगितले जात नाहीत. तसाच एक किस्सा सचिन तेंडुलकरने सांगितला. त्यात त्याला चक्क व्हीव्हीएस लक्ष्मणमुळे ओरडा मिळाला होता. त्यामागचे कारणही सचिननं हा किस्सा सांगताना सांगितले आहे. शिवाय ओरडा मिळाल्यानंतर सचिननं काय केले ते ही सांगितले आहे. चितळे समुहाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमीत्ताने आज पुण्यात ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी सचिन तेंडुलकर याची मुलाखत घेतली. त्यावेळी हा भन्नाट किस्सा सचिन तेंडुलकरने सांगितला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हा किस्सा भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या सामन्या दरम्यानचा आहे. बंगळुरूमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय सामना सुरू होता. त्यावेळी सचिन बॅटींग करत होता. सचिनने चांगले फटके ही मारले होते. खेळपट्टीवर त्याचा जम ही बसला होता. त्यावेळी सचिनच्या धावा झाल्या होत्या 34. दुसऱ्या बाजूला व्हीव्हीएस लक्ष्मण फलंदाजी करत होता. त्यावेळी एका फटका मारला. तो मायकेल बेव्हनकडे गेला. त्याचा थ्रो तेवढा चांगला नव्हता. त्यामुळे दोन धावा होती असं आपल्याला वाटलं होतं. त्यामुळे पहिला धाव घेतल्यानंतर दुसरी धाव घेण्याचा सचिनने प्रयत्न केला.
ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली
सचिन सांगत होता. दुसरी धाव घेताना मी लक्ष्मणकडे पाहीलं ही नाही. दोन धावा सहज होणार होत्या. त्यामुळे सरळ धावत सुटलो. लक्ष्मणने आधीच दुसऱ्या धावेसाठी नकार दिला होता. मी अर्ध्या पीचवर पोहोचलो होतो. पण नंतर रन आऊट झालो. रन आऊट झाल्याचा मला प्रचंड राग आला होता. कधी नव्हे तो चिडलो होतो. माझा राग मी मैदानातच व्यक्त केला होता. त्यानतंर सामना संपला. मी घरी परत आलो. त्यावेळी मला सर्वात आधी माझा भाऊ अजितनं मला बोलवून घेतलं. बाजूला बसवलं.
त्यानंतर त्याने माझे कान धरले. तो मला ओरडला. तु जे काही मैदानावर केलं ते काय होतं? ही कसली रिअँक्शन होती. ते करुन काही फायदा होणार होता का? किंवा त्याचा काही फायदा झाला का? अशी थेट विचारणाच त्याने केली. उलट तू लक्ष्मणला अपसेट करून मैदाना बाहेर आलास. त्यानंतर मला माझी चुक समजली. शिवाय लक्ष्मणला फोनही केला. आम्ही लक्ष्मणला लच्ची असं म्हणत. मी त्याला म्हणालं लच्ची तुझ्यामुळे मला घरी ओरड मिळाला आहे. हे सांगताना सचिन म्हणाला, घरी कुणी तरी अशा गोष्ठी सांगणारा मोठा व्यक्ती नक्की हवा. त्याचा आपल्यालाच फायदा होतो. त्याचा फायदा आपल्याला पुढे झाला असंही सचिननं यावेळी स्पष्ट केलं.