Brian Lara Record: मुल्डरला जमलं नाही आता हे 2 जण मोडू शकतात लाराचा 400 रन्सचा रेकॉर्ड, भविष्यवाणीनं खळबळ

Who can break Brian Lara's world record of 400 runs: ब्रायन लाराचा 400 रन्सचा रेकॉर्ड अद्याप अबाधित आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Brian Lara's world record: ब्रायन लाराचा 400 रन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अद्याप अबाधित आहे.
मुंबई:

Who can break Brian Lara's world record of 400 runs:  वियान मुल्डरच्या (Wiaan mulder) 367 धावांच्या खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेविरुद्धची टेस्ट सीरिज 2-0 ने जिंकली. वर्ल्ड चॅम्पियन आफ्रिकेनं दुसऱ्या टेस्टमझध्ये झिम्बाब्वेचा एक इनिंग आणि 236 रन्सनं पराभव केला. मुल्डरकडे ब्रायन लाराच्या नाबाद 400 रन्सचा रेकॉर्ड मोडण्याची संधी होती. पण त्यानं तो रेकॉर्ड मोडण्यापूर्वी 34 रन्स शिल्लक असतानाच इनिंग घोषित केली. त्यामुळे लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड अद्याप अबाधित आहे. अशा परिस्थितीत, भविष्यात कोणता बॅटर लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडू शकेल, हा प्रश्न कायम आहे. याबाबत दोन खेळाडूंची नावं पुढं आली आहेत. 

2 जणांना संधी 

टीम इंडियाचा क्रिकेटपटू अभिषेक शर्माचे (Abhishek Sharma) वडील राजकुमार शर्मा (Raj Kumar Sharma) यांनी NDTV शी बोलताना लाराचा रेकॉर्ड मोडण्याची क्षमता असलेल्या 2 जणांची नावं सांगितली आहेत. राजकुमार शर्मा म्हणाले की शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांच्यात ही क्षमता आहे, परंतु त्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

Advertisement

(नक्की वाचा: IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये इतिहास घडणार! 4 भारतीय खेळाडूंची महारेकॉर्डवर नजर )
 

अभिषेक शर्माने अजून टेस्ट क्रिकेट खेळलेले नाही. राजकुमार शर्मा यांना आशा आहे की गिलकडून प्रेरणा घेऊन अभिषेकही टेस्ट क्रिकेट गाजवेल. टेस्ट खेळणं हे अभिषेकचं स्वप्न असल्याचं राजकुमार यांनी सांगितलं. एजबस्ट टेस्टमध्ये शुबमन गिलनं अप्रतिम बॅटिंग करत 430 रन्स केले. त्यानं पहिल्या इनिंगममध्ये 269 तर दुसऱ्या इनिंगमध्ये 169 रन्स केले. 

Advertisement

राजकुमार शर्मा यांनी आपल्या मुलाबद्दल बोलताना सांगितले की, शुभमनची खेळी पाहून अभिषेक खूप आनंदी आहे. गिलच्या शानदार खेळीनंतर आणि भारताच्या विजयानंतर त्याने आपल्या मित्रांना पार्टी देखील दिली आहे. अभिषेक रेड बॉल क्रिकेटसाठी जोरदार सराव करत आहे. भारतासाठी टेस्ट मॅच खेळण्याचे त्याचेही स्वप्न आहे. मला पूर्ण आशा आहे की तो दिवस लवकरच येईल.
 

Advertisement
Topics mentioned in this article