Shubman Gill : शुबमन गिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी 'मिस्ट्री गर्ल' कोण आहे?

Shubman Gill Birthday : टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिलनं त्याचा 25 वाढदिवस बेंगळुरुमध्ये साजरा केला.गिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीची सर्वत्र चर्चा होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुबमन गिलनं (Shubman Gill) रविवारी त्याचा 25 वाढदिवस बेंगळुरुमध्ये साजरा केला. यावेळी झालेल्या पार्टीमध्ये इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह अन्य खेळाडू आणि गिलचे मित्र सहभागी झाले होते. सर्व मित्रांनी त्याला खास अंदाजामध्ये शुभेच्छा दिल्या. गिलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या मैत्रिणीची सर्वत्र चर्चा होत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अवनीत कौर असं गिलच्या खास मैत्रिणीचं नाव आहे. अवनीतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गिलचा फोटो पोस्ट करत लिहिलं आहे, 'शुबमन वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू लोकांना प्रेरणा देतोस, मला नेहमीच तुझा अभिमान आहे.' अवनितची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली आहे. त्यानंतर अवनीत कौर नेमकी कोण आहे? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.

( नक्की वाचा : Himanshu Singh : 21 वर्षांच्या मुंबईकरची का होतीय चर्चा? त्याचं अश्विनशी काय आहे साम्य? )
 

कोण आहे अनवीत कौर?

अवनीत कौर ही टीव्ही अभिनेत्री आहे. ती डान्स इंडिया डान्स, लिटिल मास्टर्स, झलक दिखला जा-5, मर्दानी, चंद्रा नंदिनी  या मालिकांमधून चर्चेत आली होती. ती मुळची पंजाबंधील जालंधर शहरातील आहे. अवनीतनं आठव्या वर्षापासूनच तिची कारकिर्द सुरु केली आहे. मुंबईतील एका खासगी कॉलेजमधून तिनं कॉमर्स शाखेच्या पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

इन्स्टाग्रामवर अवनीतचे एकापेक्षा एक सुंदर फोटो आहेत. 

अवनीत कौरचे फोटो तिच्या फॅन्सना नेहमी आवडतात. त्यामुळे ती नियमित अंतरानं पोस्ट करत असते. 
 

Topics mentioned in this article